औरंगाबाद : औरंगाबाद शहरात सर्रासपणे व्हिडीओ जुगार खेळला जात असल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. शहरात सध्या १५पेक्षा अधिक गाळ्यांमध्ये टेबल, खुर्ची आणि एक संगणक टाकून हे अड्डे चालवले जात आहेत. या जुगारातून दररोज किमान एक कोटीची उलाढाल होत असल्यानं याकडे पोलीस देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

कसा चालतो हायटेक जुगार?

हायटेक मटका औरंगाबाद शहरातल्या मध्यवर्ती भागात रोजरासपणे चालतो आणि यातून दिवसाला लाखोंची उलाढाल होते. 10 बाय 10 च्या खोली चालणाऱ्या खेळात विद्यार्थीच सगळ्यात जास्त कंगाल होतात.

या हायटेक जुगारात खेळणारी व्यक्ती एक आकडा लावतो. लावलेला आकडा संगणकावर नोंद केल्यानंतर काही वेळाने स्क्रीनवर एक आकडा येतो. लावलेल्या आकड्याशी विशिष्ट जागी तो जुळला की दहापट पैसे मिळतात. म्हणजे १०० रुपये लावल्यास १००० रुपये एकाच मिनिटात आकडा लावणाऱ्याच्या खिशात येतात. पण असं फार कमी लोकांच्या सोबत होत असल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे. म्हणजे जवळजवळ अनेकांची फसवणूकच होते.

शहरात हजारो पोलीस तरीही हायटेक जुगार राजरोसपणे सुरुच

शहरात एक आयुक्त, 3 उपायुक्त , 6 सहाय्यक आयुक्त  आणि 25 हून अधिक पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकासह तब्बल अडीच हजार पोलिसांची फौज आहे.असं असताना देखील हायटेक जुगार 15 ठिकाणी राजरोसपणे सुरु आहे.

हायटेक जुगाराला राजकारण्यांचा वरदहस्त?

शहरात केवळ व्हिडीओ जुगारच नाही तर पत्त्याचे क्लब देखील चालतात. मिळालेल्याल्या माहितीनुसार यातील एक क्लब भाजपा पदाधिकारी चालवतो तर एक काँग्रेसचा नगरसेवक.

हा संपूर्ण हायटेक जुगाराचा संपूर्ण कारभार ‘किंग’ या टोपणनावानं एकच व्यक्ती सांभाळत  असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

जुगाराची हायटेक दुकानात प्रत्येकी दोघे जण चालवतात. एकजण पैशांची देवाणघेवाण करतो तर दुसरा कम्प्युटर चालवतो. तर इतर पाचजण वेळप्रसंगी ग्राहकांशी तडजोडीसाठी सज्ज असतात. शहरातील या अड्ड्यावर पाहणी केली असता या जुगाराला महाविद्यालयीन मुलं अधिक बळी पडत असल्याचं दिसून आलं आहे.

जुगाराच्या या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला वाचवण्यासाठी त्या तथाकथित ‘किंग’ला बेड्या ठोकणं गरजेच बनलं आहे.

VIDEO :