गुजरातचा निकाल डोळ्यात अंजन घालणारा : अनिल गोटे
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2017 08:49 PM (IST)
भाजपमधील नाराजांची यादी वाढतच चालली आहे. धुळ्यातील भाजप आमदार अनिल गोटेंनी देखील आता भाजपला घरचा आहेर दिला आहे.
नागपूर : भाजपमधील नाराजांची यादी वाढतच चालली आहे. धुळ्यातील भाजप आमदार अनिल गोटेंनी देखील आता भाजपला घरचा आहेर दिला आहे. गुजरात निवडणुकीनंतर अनिल गोटे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. गुजरात निवडणुकीचे निकाल डोळ्यात अंजन घालणारे असल्याचं गोटेंनी म्हटलं आहे. याआधीही भाजपच्या अनेक नेत्यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली आहे. खासदार नाना पटोलेंनी तर पक्ष सोडून आपली नाराजी जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ आता आमदार अनिल गोटे यांनीही घरचा आहेर दिला आहे. नेमकं काय म्हणाले अनिल गोटे? भाजपमधील यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी, वरुण गांधी, लालकृष्ण अडवाणी, नाना पटोले, आशिष देशमुख, संजय काकडे, एकनाथ खडसे आणि आता अनिल गोटे हे बडे नेते पक्षाच्या आणि सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. संबंधित बातम्या : तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबतच राहणार का? उत्तर देताना खडसे अडखळले...