मुंबई : सध्या देशातली अनेक हाय प्रोफाईल मंडळी जेलमध्ये आहेत. आजपर्यंत कधी एसीशिवाय न वावरलेली माणसं या 40-45 अंश सेल्सिअस तापमानात जेलमध्ये घामांच्या धारांमध्ये भिजत आहेत.


कोण आहेत तुरुंगातील हाय प्रोफाईल गुन्हेगार?

छगन भुजबळ

मुक्काम पोस्ट- आर्थर रोड जेल

तापमान- 32 डिग्री सेल्सिअस

आरोप- बेहिशेबी संपत्ती आणि मनी लॉन्ड्रिंग

मार्च 2015 पासून जेलमध्ये

भुजबळांची लाईफस्टाईल पाहिली तर त्यांच्याकडे आता पाहवत नाही. कुठे त्यांचा नाशिकमधला महाल आणि कुठे आर्थर रोडमधला जेल.

समीर भुजबळ

मुक्काम पोस्ट- आर्थर रोड जेल

तापमान- 32 डिग्री सेल्सिअस

आरोप- बेहिशेबी संपत्ती आणि मनी लॉन्ड्रिंग

फेब्रुवारी 2016 पासून जेलमध्ये

काकांप्रमाणेच पुतण्याचा थाटही वेगळाच. नाशिकमध्ये चर्चा तर अशी आहे, की समीर भाऊंचं फक्त पान आणण्यासाठी हेलिकॉप्टर हे मुंबई ते नाशिक भरारी घ्यायचं. पण आता ना पान,  ना मान फक्त जेलमधलं तापमान.

रमेश कदम

मुक्काम पोस्ट- आर्थर रोड

तापमान- 32 डिग्री सेल्सिअस

आरोप- अण्णाभाऊ साठे महामंडळात गैरव्यवहार...

रमेश कदमच्या गाड्या हा अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय असायचा. त्याचा पेहराव, त्याचा गॉगल आणि रुबाब काही औरच...
गाडी पांढरी, कपडे पांढरे, इतकं काय जोडेही पांढरे... पण आता जेलमधल्या गरम हवेनं डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे.

इंद्राणी मुखर्जी

मुक्काम पोस्ट- भायखळा जेल

तापमान- 32 डिग्री सेल्सिअस

आरोप- शीना बोराची हत्या

ऑगस्ट 2015 पासून जेलमध्ये

दीड वर्षांपूर्वीच्या हत्येला वाचा फुटली आणि एकेकाळी पेज थ्रीवर असणारी इंद्राणी मुखर्जी पेज वन वर आली. सेलिब्रेटी पार्टींमध्ये मश्गुल असणारी इंद्राणी जेव्हा पहिल्यांदा जेलमधून बाहेर पडली तेव्हा विश्वास बसला नाही. कुठे त्या पार्ट्या, कुठे ती शान.. आता फक्त चार भिंतीतलं भाजून काढणारं तापमान.

पीटर मुखर्जी

मुक्काम पोस्ट- आर्थर रोड जेल

तापमान- 32 डिग्री सेल्सियस

आरोप- शीना बोराच्या हत्येत मदत केल्याचा

डिसेंबर 2015 पासून जेलमध्ये

मोठमोठ्या बिझनेस मीटिंग... मीडिया कॉन्फरन्सेसमध्ये मश्गुल असणारा माणूस... नात्यांच्या गुंता असा काही वाढला, की तो सुटता सुटेना... अखेर गुंता इतका ताणला, की तुटला आणि येऊन थेट जेलमध्ये पडला.

अरुण गवळी

मुक्काम पोस्ट- नागपूर जेल

तापमान- 42 डिग्री

आरोप- कमलाकर जामसंडे हत्या प्रकरणात दोषी

एकेकाळी ज्याच्या आवाजानं मुंबई हादरायची, तो आज मुंबईपासून 800 किलोमीटरवर खितपत पडला आहे. पांढरा कुर्ता, पांढरा लेहंगा, पांढरी टोपी असा पेहराव... पण आता फक्त कैद्यांचा अवतार, वरुन तापमानाची मार...

डी. एस. कुलकर्णी

मुक्काम पोस्ट- येरवडा कारागृह, पुणे

तापमान- 39 डिग्री

आरोप- गुंतवणूकदारांचे पैसे थकवणे

पुणेकरांना ज्यांनी ड्रीम सिटीचं ड्रीम दाखवलं, ज्यांनी अनेकांच्या घराला घरपण दिलं.. तेच आता 10 बाय 10 च्या कोठडीमध्ये खितपत पडले आहेत. डीएसकेंचं पुण्यातलं घर, अहो घर कसलं, महालच तो... कित्येक एकरात पसरलेल्या या घरात काय नव्हतं,
पण आता येरवड्यातल्या कोठडीत काहीच नाही... घराचं घरपण गेलं आणि कोठडीतलं जगणं नशिबी आलं..

भाऊसाहेब चव्हाण

मुक्काम पोस्ट- नाशिक सेंट्रल जेल

तापमान- 39 डिग्री

आरोप- गुंतवणूकदारांना गंडा घालणे

मे 2016 पासून जेलमध्ये

ज्याला आयुष्यात हाँगकाँग हा शब्द उच्चारता आला नाही. तो महाभाग गुंतवणूकदारांना म्हणे वर्ल्ड टूर करवणार होता. वाट्टेल त्या थापा मारण्यात भाऊसाहेबचा हात कुणी धरायचा नाही, पण जेव्हा फुगा फुटला... तेव्हा पठ्ठ्या मलेशियात पळून गेला... अखेर जेव्हा परतला, तेव्हा ना गाड्या होत्या ना घोडा. आता फक्त 40 डिग्री तापमानात जेलमधल्या गोधड्या..

महेश मोतेवार

मुक्काम पोस्ट- ओदिशा जेल

तापमान- 31 डिग्री

आरोप- गुंतवणूकदारांना गंडा घालणे

डिसेंबर 2015 पासून जेलमध्ये

समृद्ध जीवन चिटफंडमधून मोतेवारने गुंतवणूकदारांना भुलवलं, बक्कळ माया गोळा केली... पण जेव्हा परताव्याची वेळ आली तेव्हा हात वर केले आणि समृद्ध जीवन जगणारा मोतेवार थेट जेलमध्ये आला.

कधीकाळी गारेगार एसीमध्ये झोपणारी ही माणसं गेल्या काही दिवसांपासून या तापलेल्या उन्हात खिडक्या-कवाडं नसलेल्या कोठड्यांमध्ये दिवस काढत आहेत. नियतीचे फासे किती नाट्यमयरित्या फिरतात, हेच यावरुन दिसतं.