मुंबई : शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर चहूबाजूंनी टीका होत आहे. ठिकठिकाणी निषेधार्थ आंदोलनंही केली जात असताना, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी कवितेच्या माध्यमातून रावसाहेब दानवेंवर निशाणा साधला आहे.

हेरंब कुलकर्णी यांची कविता :

 

रावसाहेब दानवे काय म्हणाले होते?              

राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा, अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळली. याशिवाय दानवे यांनी असंसदीय भाषेचा वापरही केला होता.