रावसाहेब दानवे यांनी तूर खरेदीच्या मुद्द्यावरन गेल्या आठवड्यात शेतऱ्यांबद्दल असंसदीय भाषा वापरत टिप्पणी केली होती. यावरुन राज्यभरात त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादीन काँग्रेसने थेट दानवेंचं मानसिक संतुलन सुधरावं आणि त्यांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी बदलापूरच्या बेलवली भागात शहराध्यक्ष कालिदास देशमुख यांच्या उपस्थितीत यज्ञ केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावसाहेब दानवेंचे मानसिक उपचार करावेत, अन्यथा राष्ट्रवादीच्या वतीने वर्गणी काढून त्यांचे उपचार करण्यात येतील, अशा शब्दात यावेळी राष्ट्रवादीने भाजपला फटकारलं.
दानवे काय म्हणाले?
राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा, अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळली. याशिवाय दानवे यांनी असंसदीय भाषेचा वापरही केला होता.
…तर शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो : रावसाहेब दानवे
मी कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरला, शेतकऱ्यांबद्दल नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. शेतकऱ्यांची मनं दुखावली असतील तर दिलगिरी करतो असं म्हणत त्यांनी सशर्त माफी मागितली. त्यामुळे झालेल्या चुकीबद्दल दानवे माफी मागत आहेत, की उपकार करत आहेत, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
संबंधित बातम्या :