Veer and Ujani Dam : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस ( Heavy Rain) पडत आहे. यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. सध्या पुणे (Pune) आणि सातारा (Satara) जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं उजनीसह (Ujani) वीर धरणात (Veer Dam) येणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळं उजनीसह वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असल्यानं भीमा नदीसह नीरा नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


उजनी व वीर धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु


उजनी व वीर धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळं भीमा आणि नीरा नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या पुणेसातारा जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं उजनी व वीर धरणाकडे येणारा पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळं आता वीर धरणातून 41 हजार 733 क्युसेक तर उजनी धरणातून 31600 क्युसेक  विसर्गने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळं पंढरपूरवर पुन्हा एकदा पुराची टांगती तलवार दिसत आहे.


खडकवासला धरणातून विसर्ग सुरु करणार


खडकवासला धरणातून आज मुठा नदी पात्रात 8 हजार 734 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये त्याचबरोबर खबरदारी घ्यावी, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. खडकवासला पाठोपाठ पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पवना धरण सद्यस्थितीत 99% भरलेले असून पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे. धरणात येणारा येवा विचारात घेता लवकरच पाणीसाठा 10 % होण्याची दाट शक्यता आहे. सद्यस्थितीत धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता जलविद्युत केंद्रामधून विद्युतगृहाद्वारे 1400 क्युसेक्स इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरू असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार सांडव्याद्वारे विसर्ग सोडण्यात येणार आहे.



नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन


शनिवार ते सोमवार (दि. 24  ते 26) हे तीन दिवस पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट तर मंगळवारी (दि. 27) यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, सतर्क रहावं, आवश्क असल्यास घराबाहेर पडावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे, त्याचबरोबर घराबाहेर जाताना छत्री, रेनकोट घेऊनच बाहेर जावे. झाडाखाली थांबू नये, असा सल्लाही हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.




महत्वाच्या बातम्या:


Pune Rain Update: पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस; नदीकाठच्या सतर्कतेचा इशारा, खडकवासला धरणातून विसर्ग सुरू