सातारा : सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे दरवाजे 2 फुटांनी उघडण्यात आले आहेत. कोयना धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्य़ा पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.


कोयना धरणाच्या पाणी पातळीतील वाढीमुळे धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. कोयनेच्या नदीपात्रात 10,275 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ झाली आहे.

कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्यामुळे नदीकाठच्या जवळपास 285 गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.