मुंबई : महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यामध्ये तब्बल 16 वाघांचा मृत्यू झाल्यानं वाघांच्या संरक्षण मोहिमेलाच धक्का लागला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या अहवालात ही बाब उघड झाली आहे.
2017 च्या पहिल्या 6 महिन्यात महाराष्ट्रात तब्बल 16 वाघ दगावले आहेत. यापैकी 12 वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे, तर 4 वाघांची शिकार करण्यात आली आहे. 2010 ते 2017 दरम्यान राज्यात तब्बल 95 वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती या अहवालात उघड झाली आहे.
दरम्यान 95 वाघांपैकी ३१ वाघांची शिकार झाली होती. महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेशमध्ये 13 वाघ दगावले आहेत, तर कर्नाटकमध्येही 13 वाघांचा मृत्यू झाला आहे. मात्र महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ दगावल्यानं महाराष्ट्रातल्या व्याघ्र संरक्षण मोहिमेला महाराष्ट्रात मोठा धक्का लागला आहे.
महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यामध्ये तब्बल 16 वाघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jul 2017 01:13 PM (IST)
महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यामध्ये तब्बल 16 वाघांचा मृत्यू झाल्यानं वाघांच्या संरक्षण मोहिमेलाच धक्का लागला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या अहवालात ही बाब उघड झाली आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -