Nashik Godavari Flood News: नाशिक (Nashik) शहरात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. यामुळं गोदावरी नदीला पूर आहे. रामकुंडावरील छोटी मोठे मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. धुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पुराचे पाणी आलं आहे. यंदाच्या पावसाळ्यातला पहिलाच पूर (Flood) पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केलीय. रामकुंड परिसरातील छोट्या मोठ्या दुकानदारांना दुकाने हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गंगापूर धरण हे 80 टक्क्यांपर्यंत भरलं आहे. आज दुपारनंतर गंगा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळं नांदूरसह इतर पाच गावांचा संपर्क तुटला आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस
नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस सुरु आहे. यामुळं 500 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. धरणामध्ये 80 टक्के पाणीसाठा झाला आहे. गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणात आला आहे.
नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग, पाच गावांचा संपर्क तुटला
दरम्यान, नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. नांदूरसह इतर पाच गावांचा संपर्क तुटला आहे. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नांदूर गावातून शिवरे, करंजी, निफाड, दिंडोरी जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यातला पहिलाच पूर आला आहे. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून 36 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून पाच ते सात गावांचा संपर्क तुटला आहे.
चांदोरी, सायखेडा, करंजवन गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात
नाशिक जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून गोदावरीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोदावरी नदीच्या कडेला असलेला चांदोरी, सायखेडा, करंजवन गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. चांदोरी गावातील प्रसिद्ध खंडेराव मंदिर पाण्याखाली गेली असून चांदोरी गावाच्या आजूबाजूची शेती देखील पाण्याखाली गेली आहे. गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आता गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांत कालपासून संततधार पाऊस सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या: