रत्नागिरी : मुंबईसह कोकणात तुफान पाऊस सुरु आहे. रत्नागिरीत सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेवर परिणाम झाला आहे. रेल्वे रुळावर पाणी आणि माती आल्याने अनेक ट्रेन थांबवण्यात आल्या आहेत.


चिपळूण-खेड दरम्यान रुळावर आलेली माती काढण्यात यश,  दिवाणखवटी इथे थांबलेली मत्स्यगंधा एक्सप्रेस खेडच्या दिशेने रवाना

-----------------

रत्नागिरी :मुंबईसह कोकणात तुफान पाऊस सुरु आहे. रत्नागिरीत सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेवर परिणाम झाला आहे. रेल्वे रुळावर पाणी आणि माती आल्याने अनेक ट्रेन थांबवण्यात आल्या आहेत.

कोणत्या गाड्या कुठे थांबवल्या?

- आरवली आणि संगमेश्वर स्टेशनदरम्यान रुळावर पाणी आल्याने मांडवी एक्स्प्रेस आरवली रोड स्टेशनवर थांबवण्यात आली आहे.

- दिवाण खवटी आणि खेडदरम्यान रेल्वे रुळावर माती आल्याने दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन वीर स्टेशला थांबवली आहे.

- कोचुवेली गरीब रथ कोलाड इथे थांबवण्यात आली आहे.

- आरवलीजवळच्या बोगद्यात पाणी साचल्याने मुंबईला येणारी मांडवी एक्स्प्रेस थांबवली आहे.

- राज्यराणी एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकात थांबवली आहे.

- कोकणकन्या मुंगसर स्टेशनवर थांबवण्यात आली आहे.