नवी मुंबई: राज्यात यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे डाळींच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डाळींचे उत्पादन वाढल्याने गगनाला भिडलेल्या डाळींच्या किमती चक्क ३० ते ४० टक्क्यांनी उतरल्या आहेत.


नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये डाळींची आवक वाढली आहे. लातूर, उस्मानाबाद , सोलापूर या जिल्ह्यातून डाळींची आवक वाढली आहे.

गेल्या वर्षी डाळींच्या किंमती १२० पासून २०० रुपयांवर जावून पोहोचल्या होत्या. मात्र यंदाच्या चांगल्या पावसामुळे डाळींचे उत्पादन वाढल्याने, या किॅमती ४० रूपयापासून १०० रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत.

चना डाळ सोडली तर सर्वच डाळींच्या किमती कमी झाल्या आहेत.

एपीएमसीमधील घाऊक दर

डाळींचे नाव     सद्याचे दर        गेल्या वर्षाचे दर
मूग डाळ          ६० ते ७०            ८० ते १००
तूर डाळ          ६० ते ७०             १२० ते १४०
मसूर डाळ        ६० ते ७०            १०० ते १२०
उडीद डाळ       ७० ते ८०             १३० ते १४०
चना डाळ        १०० ते ११०         १४० ते १६०

डाळींचे सध्याचे किरकोळ दर
मूग डाळ         ९० ते १००
तूर डाळ          ९५ ते ११०
मसूर डाळ       १०० ते ११०
उडीद डाळ      १०० ते ११०
चना डाळ        १३० ते १४०