लातूर: लातूरमध्ये काल संध्याकाळपासूनच पावसाने चांगली बॅटिंग केली आहे. लातूर ग्रामीण पट्टयात पावसाने जोर धरला आणि लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या साई प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.


 

काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या पावसाने धनेगाव बॅरेज अंदाजे पाणीसाठा 4 मिलीमीटर, डोगरगाव, बॅरेज 5 मिलीमीटर, खुलगापुर- भातगळी 3 मिलीमीटर, पोहरेगाव 3 मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला. तर आज झालेल्या पावसाने लातूरच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मदत होणार आहे.

 

गेल्याकाही महिन्यांपासून लातूरकर  पावसाच्या प्रतिक्षेत होते. ऐन पावसाळ्यातही लातूरला रेल्वे आणि टँकरने पाणीपुरवठा चालू होता. मात्र, काल रात्रीपासून झालेल्या पावसाने लातूरकर सुखावले आहेत.

 

सोलापूरातही पावसाची दमदार हजेरी

सोलापूरातही काल पावसाची रिमझिम सुरु होती. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात जोरदार पाऊस झाला असून, वाटबंरे ते खर्डी सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

 

उस्मानाबादमध्ये मुसळधार पावसाने घरात पाणी

उस्मानाबादमध्येही पावसाने काल दमदार हजेरी लावली. उस्मानबादमधील कदेर गावातील अनेक गावात मुसळधार पावसाने अनेक घरात पाणी शिरले होते. त्यामुळे लोकांना मंदिराचा आसरा घ्यावा लागला. त्याचबरोबर लोहरा तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला आहे.