शिर्डी : योग्य वेळ आल्यावर महाराष्ट्र राज्याचे विभाजन करणार असल्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत. शिवसेना- भाजप युती केवळ निवडणुकांपुरतीच मर्यादित असल्याचंही दानवेंनी स्पष्ट केलं आहे.


 
वेगळ्या विदर्भाला भाजपाचा पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं. केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून राज्याचं विभाजन करणाऱ्यांना भाजपचा विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच वेगळ्या विदर्भाला शिवसेनेचा विरोध असला तरी, सेना- भाजप युती केवळ निवडणुकांपुरतीच मर्यादित आहे. भाजपच्या विदर्भाच्या भूमिकेशी युतीचा संबंध नसल्याचंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते शिर्डीत बोलत होते.

 

दानवेंच्या वक्तव्यानंतर आता शिवसेना या मुद्द्यावर काय भुमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिर्डीतील साई मंदिराच्या संस्थानाच्या नवनियुक्त मंडळाच्या वादावरही दानवेंनी भाष्य केलं. सध्या नियुक्त केलेलं विश्वस्त मंडळ योग्य असून त्याचं राजकारण करु नये असं आवाहनही त्यांनी केलं.