मुलींची छेड काढणाऱ्या तिघांना 3 वर्षे सक्तमजुरी, उमरगा कोर्टाचा निकाल
एबीपी माझा वेब टीम | 30 Jul 2016 10:55 AM (IST)
उमरगा : मुलींची छेड काढणाऱ्याला तीन तरुणांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि 42 हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. उस्मानाबादमधील उमरगा कोर्टाने हा निकाल दिला. गेल्या वर्षी 20 मार्च 2015 ला उमरगा तालुक्यातील मुळज जिल्हा परिषद शाळेतल्या दहावी इयत्तेतील मुलींची आरोपींनी छेड काढली होती. एकूण सहा आरोपींनी 24 मुलींची छेडछाड काढली होती. त्या वेळी तीन मुलांनी अटकाव केला होता. त्यानंतर शिक्षकांनी या टवाळखोरांना हाकलले होते आणि पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, याचा राग मनात ठेवून टवाळखोरांनी मुलींचा पाठलाग करुन त्यांना रिक्षातून उतरवून मारझोड केली होती. या प्रकरणाचा आज उमरगा कोर्टात निकाल लागला. एकूण सहा आरोपींपैकी तीन अल्पवयीन असून, त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे आणि तिघांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.