Maharashtra Rain News : राज्यात कुठं पाऊस तर कुठं ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. काही भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे. दरम्यान, आजही राज्यात मुसळधार पाऊस, पडण्याच अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे, तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.


कोणत्या भागात पडणार पाऊस?


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. 


मराठवाड्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता


सध्या राज्यात सर्वदूर मान्सून पोहोचला आहे. दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची (Rain in Marathwada) शक्यता आहे. दरम्यान, काही जिल्ह्यांना आज (5जुलै) जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असून काही ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस झाला. दरम्यान, पुढील तीन दिवसात पावसचा जोर वाढणार असून मराठवडयात या आठवड्यात पाऊस सरासरीहून अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 


10 जुलैपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता


जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जुलै (उद्यापासून) ते 10 जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे. या काळात पावसाची तीव्रती अधिक असल्यानं नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. गेल्या 10 दिवसापासून हलकासा का होईना पण होत असलेल्या डांगी पावसाचा जोर, नंदुरबार धुळे जळगांव जिल्ह्यात व पेठ सुरगाणा कळवण सटाणा मालेगांव देवळा तालुक्यात अजुनही कायम आहे. परंतु रविवार दिनांक 7 जुलैपासुन या डांगी पावसाचा जोर काहीसा कमी होत असला तरी इतर प्रणल्यातून मध्यम पावसाची शक्यता ही टिकूनच असल्याचे खुळे म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


सावधान! 5 ते 10 जुलै राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या भागात कसा असणार पाऊस?