नागपूर: राज्यात आज आणि उद्या उष्णतेची लाट जाणवण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे.

विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं पुढील दोन दिवस राज्यात पुन्हा उन्हाच्या झळा झोंबण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात उष्णतेची लाट ओसरल्याचं चित्रं होतं. पण, आता पुन्हा एकदा राज्यात तापमान वाढण्याची चिन्हं आहेत.

गुजरातच्या सौराष्ट आणि  कच्छमध्ये सध्या तापमान वाढलं आहे. शुक्रवारी भूजमध्ये देशातील सर्वाधिक 46 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. त्यामुळं गुजरातमधील ही उष्णतेची लाट आज महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

PHOTO: उष्माघातापासून बचावासाठी काय करावं, काय टाळावं?