अहमदनगर: नगर दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरला तापमानाचा फटका बसला आहे.
उन्हात बराच वेळ हेलिकॉप्टर थांबल्यानं ते खूपच तापलं. त्यामुळे हेलिकॉप्टरचं उड्डाण रखडलं आहे.
सध्या हेलfकॉप्टर कुलिंगचं काम सुरु आहे. कुलिंग झाल्यावर उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होतील. जर कुलिंग झालं नाही तर उद्धव ठाकरे कारने जाण्याच्या विचारात आहेत.
उद्धव ठाकरे सध्या पोलीस मुख्यालयातील हॉलमध्ये अन्य मंत्र्यांसह बसून आहेत.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही विमानामध्ये दोनवेळा बिघाड झाला होता.
शिवसैनिकांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा
अहमदनगरमधील शिवसैनिकांचे मारेकरी फासावर लटकायला हवेतच. पण सूत्रधार किंवा सुपारी देणारेही फासावर लटकले पाहिजेत. मग ते सत्ताधारी पक्षाचे का असेना, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी फडणवीस सरकारवर पुन्हा निशाणा साधला.
त्याआधी उद्धव ठाकरेंनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. मृत शिवसैनिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 लाख 50 हजार रुपयांची मदत देण्यात आली.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उन्हाने हेलिकॉप्टर तापलं, उद्धव ठाकरेंचं उड्डाण रखडलं!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Apr 2018 02:28 PM (IST)
उन्हात बराच वेळ हेलिकॉप्टर थांबल्यानं ते खूपच तापलं. त्यामुळे हेलिकॉप्टरचं उड्डाण रखडलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -