मुंबई : या महिन्याच्या शेवटी सलग चार दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची मोठी तारांबळ होण्याची शक्यता आहे. 28 एप्रिल, 29 एप्रिल आणि 30 एप्रिल या सलग तीन दिवशी बँका बंद राहणार आहेत. शिवाय 1 मे रोजीही महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे.
सलगच्या चार सुट्ट्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात पैशांची चणचण भासू शकते. त्यामुळे बँकेचे व्यवहार आटोपून घेण्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस ग्राहकांच्या हातात आहे.
28 एप्रिलला चौथा शनिवार, 29 एप्रिलला रविवार, 30 (सोमवार) एप्रिलला बुद्ध पौर्णिमा आणि 1 मे (मंगळवार) रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे. या चार दिवसात आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी ग्राहकांना एटीएमचा पर्याय उपलब्ध असणार आहे.
बँकांच्या चार सुट्ट्या
28 एप्रिल- चौथा शनिवार
29 एप्रिल- रविवार
30 एप्रिल- बुद्ध पौर्णिमा
1 मे- महाराष्ट्र दिन
शनिवारपासून बँकेला सलग चार दिवस सुट्टी!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Apr 2018 11:50 AM (IST)
बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची मोठी तारांबळ होण्याची शक्यता आहे. 28 एप्रिल, 29 एप्रिल आणि 30 एप्रिल या सलग तीन दिवशी बँका बंद राहणार आहेत. शिवाय 1 मे रोजीही महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -