नागपूर : विदर्भात सध्या उष्णतेची लाट असतानाच पुढील तीन दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भात उद्यापासून तीन दिवस म्हणजेच 6, 7 आणि 8 मे रोजी हीट वेव अजून तीव्र होण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.




हवामान खात्याने यासंदर्भात एक ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यात नागरिकांना तापमानाच्या आणखी तीव्र लाटेसाठी तयार राहण्याचा इशारा देण्यात आला आहे, तसंच पुरेशी काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

विदर्भातील तापमानाने 45 अंशांचा पारा ओलांडला होता. मात्र फनी चक्रीवादळामुळे विदर्भातील तापमान काही अंशाने कमी झालं होतं. आजपासून तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. येत्या तीन दिवसात पुन्हा विदर्भातील तापमान 46 ते 47 अंशावर पोहोचू शकतं.