Jalna News : जालना सार्वजनिक रुग्णालय (Jalna Public Hospital) आणि मेडिकल कॉलेज मध्ये तृतीयपंथीयांच्या (Transgenders) उपचारासाठी स्वतंत्र बेड्स आणि एक वेगळा वार्ड आरक्षित करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले आहेत. तसंच सबंधीत यंत्रणेला याबाबत धोरण ठरवण्याच्या सूचना देखील टोपे यांनी दिल्या आहेत. तृतीयपंथीयांच्या विनंतीवरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या सूचना दिल्या आहेत.


तृतीयपंथी नागरिकांना उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी यापुढे हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र बेड्स आणि वार्ड आरक्षित असावेत यासाठी आरोग्यविभागाच्यावतीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. तृतीयपंथी नागरिकांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे स्वतंत्र वार्डबाबत विनंती केली होती. यानंतर आता राजेश टोपे यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.


आराखडा तयार करण्याचे आदेश


त्यामुळे आता तृतीयपंथी नागरिकांना उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी यापुढे हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र बेड्स आणि वार्ड आरक्षित असणार असून त्या संबंधीचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही राजेश टोपे यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत, यासाठी मेडीकल कॉलेज आणि सार्वजनिक रुग्णालयाना कायद्यानुसार या बाबतीत धोरण ठरवण्याच्या देखील सूचना करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते म्हणाले, "तृतीयपंथी नागरिक हे आपल्या समाजाचाच एक भाग आहेत. त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता आले पाहिजे, या मताचा मी आहे. ट्रान्सजेंडर नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयात बैठक झाली. बैठकीत ट्रान्सजेंडर नागरिकांच्या आरोग्य समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. ट्रान्सजेंडर नागरिकांना लिंग बदल शस्त्रक्रिया, लेसर आणि संप्रेरक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे त्यासाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना दिल्या आहेत.


हे ही वाचा-