Parambir singh Case : परमबीर सिंह यांच्यासह फरार घोषित करण्यात आलेल्या सहआरोपी विनय सिंह याला मोठा दिलासा देत त्याला फरार घोषित केल्याचा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्याही याबाबत सकारात्मक आशा वाढल्या आहेत. राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खंडणीचे गुन्हे दाखल असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय विनय सिंह याला परमबीर यांच्यासह मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयानं फरार घोषित केले होतं. या आदेशाला विनय सिंह यानं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. हायकोर्टानं या याचिकेची दखल घेत विनय सिंह याला फरार घोषित करण्याचा आदेश रद्द केला आहे.


खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात परमबीर सिंह, रियाज भाटी आणि विनय सिंह यांना आरोपी दाखवण्यात आलं आहे. विनय सिंह उर्फ बबलू याच्यावर आयपीसी कलम 384, 385, 388, 388, 120 ब आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून हा तपास नंतर सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आला. याप्रकरणी आपली सुटका व्हावी म्हणून विनय सिंह यानं मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. मात्र मुंबई सत्र न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर विनय सिंह याने या निकालाला आव्हान मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.


दरम्यान सीआयडीनं या तिन्ही आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं. पोलिसांनी अटकपूर्व जामीनावर आपल्याला सोडून द्यावे तसेच खटला पूर्ण होत नाही तोपर्यंत पोलिसांना अटक न करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश द्यावेत अशी मागणी करत ऍड अनिकेत निकम यांच्या मार्फत विनय सिंहनं हायकोर्टात ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीनं कोर्टाला सांगितलं गेलं की फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार प्रक्रिया न पाळता फरार घोषित करण्यात आले.


कायद्यानुसार फरार घोषित करण्यापूर्वी आरोपीला 30 दिवसांची रितसर नोटीस देणं आवश्यक आहे. तसेच गुन्हा झाला तेव्हा सिंहनं मुंबई सत्र न्यायालयात तसेच मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता असंबी न्यायालयाला सांगण्यात आलं. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत दंडाधिकारी न्यायालयानं विनय सिंह याला फरार घोषित करण्याचा आदेश रद्द केला.


संबंधित बातम्या


Parambir Singh Case Update : परमबीर सिंह यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द


भेटीगाठींच्या सत्रामुळे वाद टाळण्यासाठी वाझे आणि देशमुखांची वेगवेगळ्या दिवशी हजेरी, चांदीवाल आयोगाचा निर्णय


Anil Deshmukh : वसुलीप्रकरणी अनिल देशमुख चौकशीसाठी चांदीवाल आयोगासमोर हजर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha