Aaditya Thackeray Tweet On Nanded and Sambhajinagar Tragedy: आधी नांदेड (Nanded) आणि मग छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) 24 तासांत मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा हादरवणारा आहे. महत्त्वाचं म्हणजे, यामध्ये सर्वाधिक प्रमाण नवजात बालकांचं (Newborn Baby) आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. यावरुन विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच, याप्रकरणी मुख्यमंत्र्यांसह (CM Eknath Shinde), आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. अशातच ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यासंदर्भात ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. 


माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "कालच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान झाल्याची भीषण धटना घडली असताना, आज तसाच भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगर मधल्या घाटी रुग्णालयात घडल्याचं समोर येतंय. 2 बालकांसह 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या रुग्णालयातही अजून 7 मृत्यू झाल्याचं समजतंय. हे सगळं भयानक आहे. शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का अशी शंका येतेय." 






"महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था या भ्रष्ट मिंधे-भाजपा सरकारच्या काळात कोलमडून गेल्याचं ढळढळीतपणे दिसतंय. लोकांच्या जीवाची यांना पर्वा नाही, परिस्थितीचं गांभीर्य नाही. अशांना सत्तेच्या खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्कच नाही", असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. 


दरम्यान, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची केंद्र सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. सदर घटनेप्रकरणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी रुग्णालय प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :                                 


Maharashtra: भाजप हजारो कोटी प्रचारावर खर्च करते, पण लहानग्यांच्या औषधांसाठी पैसे नाहीत? नांदेड रुग्णालयातील प्रकारानंतर राहुल गांधींचा थेट सवाल