हर्षवर्धन पाटील भाजपात येणार होते, तावडेंचा गौप्यस्फोट
यावेळी तावडे म्हणाले, “हर्षवर्धन पाटील हे गोपीनाथ मुंडेंचे लाडके होते. परवाचं आमचं सरकार सत्तेत येईपर्यंत सर्वाधिक सत्तेत कोण राहिले तर हर्षवर्धन पाटील. आधी आमच्याबरोबर, मग आम्ही जातोय हे कळल्या-कळल्या त्यांनी काँग्रेसमध्ये उडी मारली. मग विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील हे आमच्याकडे (भाजपत) येणार होते. पण मीच त्यांना घेऊ नका असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं” याबाबत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, "2007 विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना हेच विनोद तावडे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मला काँग्रेसमध्ये घ्या आणि उमेदवारी द्या, असा आग्रह माझ्याकडे करत होते. कदाचित मुंबईत त्यांना काम शिल्लक न राहिल्यामुळे बहुतेक ते इथे टीका करत आहेत, त्याकडे फारसं लक्ष द्याव, असं मला वाटत नाही." माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा घोड्यावरुन प्रचारविनोद तावडेंचा गौप्यस्फोट नव्हे हास्यस्फोट : हर्षवर्धन पाटील
एबीपी माझा वेब टीम | 17 Feb 2017 08:02 AM (IST)
पुणे : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या गौप्यस्फोटावर काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे. शिक्षणमंत्र्यांचा गौप्यस्फोट नसून हास्यस्फोट आहे, असा टोला हर्षवर्धन पाटील यांनी लगावला. ते इंदापुरात बोलत होते. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील भाजपात येणार होते, पण त्यांना मी रोखलं, असा दावा विनोद तावडे यांनी भिगवणमधील प्रचारसभेत केला होता.