पुणे : वरातीत नाचण्यापेक्षा व्हॉलीबॉल खेळताना पडलेलं कधीही चांगलं, असा टोला हर्षवर्धन पाटलांनी (harshawardhan patil) आमदार दत्तात्रय भरणेंना (Dattatray Bharne) लगावला आहे. इंदापूर बाहेर तालुक्याचं नाव सांगायचं म्हटलं तर दबक्या आवाजात बोलावं लागतं कारण तालुक्याचं कर्तुत्वच तेवढं मोठं आहे, असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी भरणेंवर निशाणा साधला आहे. इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी माजी सहकार मंत्री कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी यावर्षी कर्मयोगी साखर कारखाना शेतकऱ्यांना काटा पेमेंट देणार असल्याची घोषणा केली आहे.
यासोबतच हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना देखील टोले लगावले. बाहेर कुठे गेलो तर इंदापूर तालुक्याचं नाव सांगायचं म्हटलं तर दबक्या आवाजात बोलावं लागतं कारण तालुक्याचं कर्तुत्वच तेवढं मोठं आहे, असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना टोला लगावला.
शिवाय परवा माझा पाय फ्रॅक्चर झाला तर काही लोक त्यावर देखील बोलतात मात्र वरातीत नाचण्यापेक्षा व्हॉलीबॉल खेळताना पडलेलं कधीही चांगलं, असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी भरणे यांना खडेबोल सुनावले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या पायाला प्लॅस्टर असताना देखील हर्षवर्धन पाटील यांनी सभेला हजेरी लावली. कारण हर्षवर्धन पाटील हे कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत.
हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे यांच्यात कायम वाद?
हर्षवर्धन पाटील यांचा दत्तात्रय भरणे यांनी 2014मध्ये पराभव केला होता. 2019 साली कॉग्रेसने उमेदवारी न दिल्याने हर्षवर्धन पाटील यांची भाजपमध्ये प्रवेश केला होता. भरणे सातत्याने भरणे हर्षवर्धन पाटलांवर टीका करत असतात. 19 वर्ष तुमच्याकडे मंत्रीपद होतं. त्यावेळ तुम्ही तालुक्यात कोणता विकास केला, असा सवाल ते कायम उपस्थित करत असतात. अनेकदा भरणे हे नवरदेवासोबत घोड्यावर बसताना किंवा कबड्डी खेळताना बघायला मिळालं आहे. यावरुनच हर्षवर्धन पाटील यांनी भरणेंवर निशाणा साधला आहे.
सध्या महायुतीचं सरकार आहे. ज्यावेळी भाजप आणि शिवसेनेचं सरकार राज्यात आलं होतं त्यावेळी निधी वाटपावरुन वादवादी झाली होती. त्यानंतरही निधी वाटपावरुन श्रेयवादाची लढाईदेखील बघायला मिळत होती. भाजप आणि शिवसेनेची सत्ता असताना झालेले सगळे विकास कामं आम्ही केले आहेत, असा दावा हर्षवर्धन पाटील करत होते. त्यामुळे मागील काही वर्षांपासून हर्षवर्धन पाटील आणि भरणे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु असल्याचं बघायला मिळालं आहे.
हेही वाचा