मुंबई : मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन हर्षल रावते या तरुणाने आत्महत्या केली आहे. हर्षल रावते हा 43 वर्षांचा होता.
हर्षल मुंबईतील चेंबुरमधील रहिवासी होता. हर्षलच्या वडिलांचं चेंबुरमध्ये मसाल्याचं दुकान आहे.
मंत्रालयात गृह विभागात कामासाठी हर्षल रावते आला होता, अशी माहिती मिळते आहे. त्यावेळी त्याने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारली. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान हर्षलचा मृत्यू झाला. हर्षलच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
हर्षल रावते मेहुणीच्या हत्येतील दोषी
मेहुणीच्या हत्येप्रकरणी हर्षल रावते दोषी होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो 302 च्या कलमाअंतर्गत 2014 सालापासून औरंगाबादमधील पैठण ओपन जेलमध्ये शिक्षा भोगत होता. 10 जानेवारीपासून हर्षल रावते पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता. त्याला 30 दिवसांची पॅरोलची रजा मंजूर झाली होती.
सुसाईड नोटमध्ये काय?
हर्षलच्या पँटच्या खिशात सुसाईड नोट सापडली आहे. कारागृहातील कालावधीबद्दल हर्षल निराश होता. न्याय मिळत नसल्याची त्याची खंत होती. मंत्रालयात येऊन संबंधित विभागातील लोकांना भेटून, न्याय मिळेल अशी हर्षलला अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने तो निराश झाला होता, असे हर्षलच्या सुसाईड नोटवरुन लक्षात येते आहे.
हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच हर्षलचा मृत्यू : डॉक्टर
हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच हर्षलचा मृत्यू झाला होता. पंचनामा झाल्यानंतर पोस्टमार्टम होईल. पोस्टमार्टमनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती जेजे रुग्णालयाचे डिन डॉ. सुधीर ननंदकर यांनी दिली.
दरम्यान, पोलिसांनी हर्षलच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. हर्षलने आत्महत्या केली, की त्याला कुणी ढकललं, की तो पडला, अशा सर्व शक्यता पोलिस तपासणार आहे.
मंत्रालयाच्या 5 व्या मजल्यावरुन उडी मारुन तरुणाची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Feb 2018 07:25 PM (IST)
मेहुणीच्या हत्येप्रकरणी हर्षल रावते दोषी होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो 302 च्या कलमाअंतर्गत 2014 सालापासून औरंगाबादमधील पैठण ओपन जेलमध्ये शिक्षा भोगत होता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -