Haribhau Rathod : ओबीसी नेते मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण (OBC Reservation) देऊ नये म्हणून विरोध करत आहे. यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाजात संघर्ष पाहायला मिळत आहे. या वरून माजी खासदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि बबनराव तायवाडे (babanrao taywade) यांच्यावर टीका केली आहे. ओबीसींचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवताय, असे त्यांनी म्हटले आहे.


हरिभाऊ राठोड म्हणाले की, ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी जनजागरण यात्रा काढली आहे. त्यातून ओबीसींना भयभीत करण्यात येत आहे. सरकारने सगेसोयऱ्याच्या बाबतीत घेतलेला निर्णय चांगला आहे, असे तायवाडे यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ हे आमचा मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याबाबत विरोध नाही. परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, असे ते सांगत आहेत.


राजकीय पोळी भाजून भाजपात जाण्याची तयारी


भुजबळ सांगतही नाही की, मराठा समाजाला आरक्षण देणार कसे, एकीकडे ओबीसीला (OBC) भावनात्मक भडकावून, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून भाजपात (BJP) जाण्याची तयारी सुरु आहे. बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नागपूरकडे झुकले आहेत. हे उघड-उघड ओबीसींना मूर्ख बनवत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.


काय म्हणाले छगन भुजबळ?


हरिभाऊ राठोड यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. यावर भुजबळ म्हणाले की, सगळ्यांना मूर्ख बनवणारा हरिभाऊ राठोड आहे. बाकीच्या लोकांचे मत आहेत. 17 टक्के आहेत त्यात विभाजन कशाला? या माणसापासून ओबीसींनी सावध राहिले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले. 


आज अहमदनगरमध्ये ओबीसींचा महाएल्गार


अहमदनगरयेथील क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर आज (दि. 03) ओबीसींचा महाएल्गार मेळावा (OBC Mahaelgar Melava) दुपारी तीन वाजता पार पडणार आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेश निघाल्यानंतर हा पहिला मेळावा अहमदनगरमध्ये (Ahmednagar) होत आहे. या मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Chhagan Bhujbal : गोळीबार प्रकरणात फडणवीसांचा काय संबंध? सुप्रिया सुळेंच्या टीकेला छगन भुजबळांचे प्रत्युत्तर


उल्हासनगरमधील गोळीबारानंतर अजित पवार संतापले म्हणाले; कायदा हातात घेणं चांगलं नाही, फडणवीसांशी चर्चा करणार