Chhagan Bhujbal नाशिक : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यावरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग होत असेल तर गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी प्रत्युतर दिले आहे. 


छगन भुजबळ म्हणाले की, मी काल टिव्हीवर पाहिले. पोलीस ठाण्यात गोळीबार झाला मला आश्चर्य वाटले. एवढा संताप कशासाठी याचे कारण कळले नाही. ज्यांना गोळ्या लागल्या त्यांचे प्राण वाचावे, अशी प्रार्थना करतो. नक्की काय घडले हे पोलीस तपासात समोर येईलच. शेवटचा भाग समोर आला आधी काय घडलं ते पाहावे लागेल, असे ते म्हणाले. 


यात फडणवीस यांचा काय संबंध?


सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेवर छगन भुजबळ म्हणाले की,  फडणवीसांनी सांगितले का गोळ्या मारायला. यात फडणवीस यांचा काय संबंध आहे. दोन लोकांचे वैयक्तिक भांडण आहे. मला पण एक आमदार शिव्या देतोय, धमकी देतोय,  फडणवीस कायदेशीर कारवाई करतील, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे. अर्थात यात दुसरी बाजू समोर आली आहे. नाहीतर अंतरवाली सराटीसारखे होईल एकच बाजू समोर आली. यात दोन्ही बाजू समोर याव्या, असेही भुजबळ म्हणाले. 


विजय झाला तर उपोषण कशासाठी?


अहमदनगर येथे आज छगन भुजबळांच्या उपस्थितीत ओबीसी महाएल्गार मेळावा होत आहे. यावर भुजबळ म्हणाले की, आजच्या सभेसाठी मुद्दे खूप आहेत. जे काही होतंय त्यात सुप्रिम आणि हायकोर्टाने नकारात्मक भाष्य केले आहे.  तरी पुन्हा तेच काम केले जात आहे. विजय झाला आहे. गुलाल उधळला आहे. रात्री 3, 4 पर्यंत डीजे लावत जात ओबीसींना त्रास दिला जात आहे. विजय झाला तर उपोषण कशासाठी, असा सवाल त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपस्थित केला आहे. 


ओबीसींवर बहिष्कार टाकला जातोय


या प्रकरणामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. ओबीसींवर बहिष्कार टाकला जात आहे. उन्माद केला जात आहे. पोलीस सक्रीय राहून कारवाई करत नाही. माझ्याकडे तक्रारी येत आहेत. पुढे जावून आरक्षण बाजूला राहील आणि नवीन प्रश्न उभा राहील. याबाबत सर्व पक्षाचे आणि राज्याचे प्रमुख लोक सेवकांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. 


या माणसापासून ओबीसींनी सावध राहिले पाहिजे


हरिभाऊ राठोड यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. यावर भुजबळ म्हणाले की, सगळ्यांना मूर्ख बनवणारा हरिभाऊ राठोड आहे. बाकीच्या लोकांचे मत आहेत. 17 टक्के आहेत त्यात विभाजन कशाला? या माणसापासून ओबीसींनी सावध राहिले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले. 


आणखी वाचा 


OBC Mahaelgar Melava : अहमदनगरमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार; मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर आज पहिलाच मेळावा