मुंबई : अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कारप्रकरणी चर्चा करण्यास नकार दिल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनाच लक्ष्य केलं आहे. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे.

 

कोपर्डी बलात्कारप्रकरणी विधानसभेत काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी तर विधानपरिषदेत धनंजय मुंडेंनी विधानपरिषदे स्थगन प्रस्ताव आणला होता. मात्र विधानसभेतील प्रस्ताव अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फेटाळला.

 

याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिल्यामुळे आज चर्चा करण्यास बागडे यांनी नकार दिला. एकीकडे मुख्यमंत्री आम्ही चर्चेसाठी तयार आहोत म्हणत होते, दुसरीकडे विरोधक आजच चर्चा करण्यासाठी आग्रह होते, मात्र अध्यक्षांनी चर्चेस नकार दिला. त्यामुळे विरोधक चांगलेच संतापले.

 

कोपर्डीत नववीत शिकणाऱ्या मुलीवर पाशवी बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. दिल्लीतील निर्भयाकांडापेक्षा हे प्रकरण अत्यंत थरकाप उडवणारं आहे. त्यामुळे याबाबत आजच चर्चा व्हायला हवी, अशी मागणी विरोधकांची होती.

 

कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार

कर्जतमधील कोपर्डी गावात 13 जुलैला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या नराधमांना अटक करण्यात आली आहे. दोघांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार


नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर


कोपर्डी प्रकरण: राम शिंदेंसोबत फोटोत असलेली ‘ती’ व्यक्ती आरोपी नाही


आरोप करणाऱ्यांनी राम शिंदेंची जाहीर माफी मागावी: मुख्यमंत्री


राम शिंदे फोटो प्रकरणावर धनंजय मुंडेंकडून दिलगिरी


मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई


कोपर्डी बलात्कारातील आरोपीचा राम शिंदेंसोबत फोटो, राष्ट्रवादीचा दावा