Haji Arfat Shaikh : नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीन जिंदाल (Naveen Jindal) यांना आता माफ करायला हवं अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांची दिली आहे. भाजपच्या (BJP) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर (Prophet Mohammad) यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. या प्रकरणाबाबत भाजपचे नेते हाजी अराफत शेख (Haji Arfat Shaikh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


'कोणत्याही धर्माबाबत बोलणे चुकीचे आहे.  नुपूर शर्मा यांचे वक्तव्य चुकीचे आहे. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना आता माफ करायला हवं. असे वक्तव्य ऐकल्यानंतर आमच्या ही मनाला वेदना होतात. 'असं हाजी अराफत शेख म्हणाले. मात्र या गोष्टी कोणत्या मौलानापासून बाहेर चर्चेला येतात याचाही विचार व्हावा, असंही  हाजी अराफत शेख यांनी सांगितलं. 


नुपूर शर्मा जे बोलल्या तसेच झाकीर नाईक यांनी बोलले होते त्यामुळे त्यांना भारतातून बॅन केले आहे. आपण  या देशाला बाबरच्या नजरेतून बघू नये तर अजमेरच्या सरकार गरीब नवाज यांच्या नजरेतून बघावं आणि त्यांना माफ करायाला हवं, असा सल्ला हाजी अराफत शेख यांनी दिला. 
 
पुढे ते म्हणाले, 'माफ करणं हा आमच्या नबी (पैगंबर) यांचा स्वभाव आहे. इस्लाम माफ करण्याबाबत शिकवण देतो. प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या काळात देखील असे अनेक प्रसंग आले, मात्र त्यांनी स्वतः त्यांना माफ केलं. त्यामुळे जर कोणी माफी मागत असेल तर त्याला माफ करायला हवं. जेव्हा तणाव निर्माण होतो तेव्हा हिंदू, मुस्लिम सर्वांचेच नुकसान होतं असतं.' 


बुलडोझर कारवाईबाबत हाजी अराफात शेख यांची प्रतिक्रिया
उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईबाबत हाजी अराफत शेख यांनी सांगितलं,  'जिथे जिथे बेकायदेशीर कामे झालेत तिथेही बुलडोझर चालले आहे. भाजप चांगले काम करते ते दाखवत नाहीत. काँग्रेस आणि इतर विरोधक ज्यांच्याकडं काही काम नाही असे लोक अशा चर्चा घडवून आणतात. हाजीअली मशीदीवीर जेव्हा हातोडा चालवला जाणार होता तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी ते थांबवले होते. बांद्रा येथे कब्रस्थान रेल्वेच्या क्षेत्रात येणार होते ते वाचविण्याचे काम आशिष शेलार यांनी रेल्वे मंत्र्यांना फोन केले.'


हेही वाचा 


Swara Bhasker : नुपूर शर्मांबाबतचे गौतम गंभीर यांचे ट्वीट चर्चेत; स्वरा भास्कर म्हणते....