औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांसाठी न्यायालयीन लढाई लढणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आता शिंदे गटाच्या एका आमदाराच्या विरोधात न्यायालयात उभे राहणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायाधीशांसाठीच्या क्वार्टर्ससाठी टेंडर प्रक्रियेत टेंडर भरू नयेत म्हणून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी एका कंत्राटदाराला धमकी दिल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. संबंधित कंत्रांटदाराच्या बाजूने न्यायालयात आपण बाजू मांडणार असून, याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती सदावर्ते यांनी दिली आहे.


औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्ते म्हणाले की, "औरंगाबादच्या न्यायाधीशांच्या निवासस्थानाच्या बांधकामाच्या टेंडर प्रक्रियेत भाग घेऊ नये म्हणून आमदार शिरसाट यांनी औरंगाबादमधील बाबा कन्स्ट्रक्शनच्या मालकाला धमकी दिली. टेंडर भरल्यानंतर सुद्धा शिरसाट यांच्या पीएने त्यांना बोलून धमकावलं. तर या टेंडर प्रक्रियेत मोठा घोळ झाला असून, या सर्व प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती सदावर्ते यांनी दिली आहे."


आमदार शिरसाटांच्या अडचणीत वाढ


अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहे. त्यातच आता प्रकरण थेट न्यायालयात पोहोचलो आहे. त्यामुळे आता न्यायालय काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या आरोपानंतर आमदार शिरसाट यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच सदावर्ते आता न्यायालयात कोणते पुरावे सादर करणार आणि शिरसाठ कशी बाजू मांडणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :