पंढरपूर : सध्या सर्वत्र कोरोनाची दहशत असल्याने विठुरायाचा पाडवा देखील बंद मंदिरातच होत आहे. तरीदेखील परंपरा म्हणून मंदिर समितीने मिळेल त्या फुलांमध्ये विठ्ठल आणि रूक्मिणीचा गाभारा कर्मचाऱ्यांकडून सजवून घेतला आहे. कोरोनाच्या भितीमुळे विठ्ठल मंदिर भावीकांसाठी बंद असले तरी देवाचे नित्योपचार प्रथेनुसार मंदीर समिती पुजारी आणि कर्मचारी करत असतात. पाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असल्याने विठुरायाच्या गाभाऱ्यात सोनचाफा, मोगरा आणि इतर सुगंधी फुलं, पानांची सजावट करण्यात आली आहे. दरम्यान, इतिहासात पहिल्यांदाच कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पंढरपूरचं विठ्ठल मंदीर बंद करण्याचा निर्णय मंदीर समितीने घेतला आहे. देवाच्या प्रसन्नतेतून मानवजातीवरील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे ही भावना नक्कीच आहे.


मागील तीन वर्षापासून विविध उत्सवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आणि फळांची आकर्षक सजावट करण्यात येते. परंतु 17 मार्चपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन बंद करण्यात आले आहे. यामुळे पंढरपुरात भाविक येणे बंद झाले आहे.


पाहा व्हिडीओ : गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा गाभारा पानाफुलांनी सजला



संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली असतानाच देशभरात अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गर्दीची ठिकाण बंद करण्यात आली आहेत. अशातच राज्य शासनाने दिलेल्या सुचनेनुसार, पंढरपूर विठ्ठल रुक्माई मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय पंढरपूर देवस्थान विश्वस् मंडळाने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या हितासाठी मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त आमदार राम कदम यांनी दिली होती.


दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं दिलेल्या सुचनेनुसार राज्यातील अनेक मंदिरं बंद करण्यात आली आहेत. त्यात तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, शेगावचं गजानन महाराज मंदिर, नृसिंहवाडीचं दत्त मंदिर, जेजुरीचं खंडोबा मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. तर शिर्डीचं साईबाबा मंदिरही अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलं आहे. त्याचबरोबर गणपतीपुळे, मुंबादेवी, परळी वैद्यनाथ मंदिरंही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


संबंधित बातम्या : 


coronavirus | राज्यभरातील बहुतांश मंदिर बंद, गर्दी टाळण्यासाठी निर्णय