पंढरपूर : लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या नवरदेवाचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. शैलेंद्र शिवाजी शिंदे असे या नवरदेवाचं नाव आहे.


 

लग्नात शेवटची अक्षता पडताना शैलेंद्र शिवाजी शिंदे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. पंढरपूर तालुक्यातील देगाव जवळील शिंदे वस्तीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.

 

पारण्याच्या वेळेस वऱ्हाड मंडळीत दोन गटात भांडण झालं होतं. त्या तणावामुळेच शैलेंद्र शिंदेंचा मृत्यू झाल्याचा आरोप नवरदेवाच्या नातेवाईकांनी केला आहे.

 

शैलेंद्र यांना हृदयविकाराचा धक्का भांडणांच्या तणावामुळे आला की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत अद्याप पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.