मुंबई : 16 जिल्ह्यातल्या 3 हजार 131 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला. मात्र या निवडणुकांमध्ये नेमकी कोणत्या पक्षाने बाजी मारली, हे अद्याप राज्यातील जनतेला समजू शकलेलं नाही. कारण भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपणच आघाडीवर असल्याचा दावा करत आहेत.
भाजपच्या नेत्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन एक हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला होता. तर भाजपचा हा दावा म्हणजे 'गिरे तो भी टांग उपर' असा प्रकार असल्याची टीका काँग्रेसनं केली.
काँग्रेसने ग्रामपंचायत निवडणुकीत अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केला आहे. या निवडणुकीत काँग्रेस हा क्रमांक एकचा पक्ष राहिल्याचं ते म्हणाले.
16 जिल्ह्यातील 3131 ग्रामपंचायती पैकी 1063 ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता आली असून भाजपाला केवळ 813 ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला, असं काँग्रेसने सांगितलं. राष्ट्रवादीने 834, तर शिवसेना आणि अपक्ष यांनी 421 ग्रामपंचायतीवर विजय मिळवल्याचं वाघमारेंनी सांगितलं.
पक्ष
|
भाजपचा दावा (जागांवर विजय) |
काँग्रेसचा दावा (जागांवर विजय) |
भाजप
|
1457 |
813 |
काँग्रेस
|
301 |
1063 |
शिवसेना
|
222
|
421
|
राष्ट्रवादी
|
194
|
834 |
संबंधित बातम्या :