Maharashtra Panchayat Election 2021 Final Results LIVE | जेसीबीतून भंडारा, गुलाल उधळणं महागात; चार नवनिर्वाचित ग्रामसदस्यांसह 20 जणांवर गुन्हा
Gram Panchayat Election Results 2021 LIVE Updates: राज्यातील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला पार पडल्या. या निवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना भावानेच दिला धक्का, माणिकराव कोकटेंचा पॅनल सख्खा भाऊ भरत कोकाटेंकडून पराभूत,
सिन्नर तालुक्यातील सोमठाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदारांचा पॅनलचा पराभव,
, भरत कोकटेच्या पॅनलला 7 तर माणिकराव कोकटेच्य पॅनलला 4 जागा मिळाल्या,
11 सदस्यांसाठी झाली निवडणूक
Maharashtra Gram Panchayat Election 2021 Results
स्व. वसंतराव नाईक आणि स्व. सुधाकरराव नाईक या महाराष्ट्राच्या दोन मुख्यमंत्र्यांचे गाव, गहुली. १९४९ पासून बिनविरोध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातील गहुली या गावी प्रथमच होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपा ७ पैकी ७ जागांवर विजयी,
गहुली ग्रामपंचायत भाजप आमदार निलय नाईक यांच्या ताब्यात ..!
Gram Panchayat Election Results Live Updates
ग्रामपंचायत निवडणुकीत मोठं यश महविकास आघाडीला मिळाले असून 80 टक्के जागा महविकास आघाडीच्या स्पष्टपणे दिसत दिसत असून आमच्या सरकारच्या कामाला पसंती दिलेली आहे. राज्यात काँग्रेसचे साडेचार हजार सरपंच होतील, असा विश्वास थोरात यांनी बोलून दाखवला तर सरपंच सोडत निवडणुकीनंतर ठेवण्यात आल्यानं निवडणूक व्यक्ती केंद्रित झाल्या नाही. 14 गावातील ग्रामपंचायत काँग्रेसबरोबर होत्या आणि राहिल्या असल्याचं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी एबीपी माझाशी बोलताना केलंय. यावेळी राजकीय प्रश्नांवर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिलाय.
शिवशाही पॅनलकडून सासू गोकर्णा आवारे आणि जावई लक्ष्मण काळे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून सून कल्याणी आवारे आणि सासरे रावसाहेब वैद्य एकमेकांच्या विरोधात होते. त्यामुळे सासूच्या विरोधात सूनान आणि सासऱ्याच्या विरोधात जावईनं निवडून येण्याचं दावा केला होता
मात्र काहीवेळापूर्वी आलेल्या निकालानुसार सून सून कल्याणी आवारे यांनी आपल्या सासू गोकर्णा आवारे यांचा पराभव केला आहे.तर दुसरीकडे जावई लक्ष्मण काळे यांनी सासरे रावसाहेब वैद्य यांचा पराभव केला आहे.
,
बोरी ग्रामपंचायतमध्ये 17 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादीचा विजय
,
राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या गटाचा विजय
Gram Panchayat Election Result : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गावात 13 पैकी 13 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसची
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गावात राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. टोपे यांच्या पाथरवाला गावात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे. गावातील 13 पैकी 13 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अंबरनाथ तालुका Gram Panchayat Election Result 2021
अंबरनाथ तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेवाळीमध्ये शिवसेनेला हादरा बसला आहे. 11 पैकी 9 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला अवघ्या दोन जागा आल्या आहेत. नेवाळी ग्रामपंचायतीमध्ये 13 जागा होत्या, त्यामधील दोन प्रभागात बहिष्कार असल्याने 11 जागांवर निवडणूक होणार होती. मात्र 11 पैकी 3 जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये शिवसेना एक तर दोन जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध आले. उर्वरित आठ जागांवर निवडणूक झाली यामधील एका जागेवर शिवसेना तर उर्वरीत सात जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले.
नितेश राणेंनी वैभववाडीचा गड राखला
सिंधुदुर्ग : नितेश राणेंनी वैभववाडीचा गड राखला आहे. नितेश राणेंच्या मतदारसंघातील वैभववाडी तालुक्यातील एकूण 13 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली आहे तर शिवसेनेला अवघ्या 4 ग्रामपंचायती मिळाल्या आहे.
राळेगणसिद्धिमध्ये अण्णा हजारेंचा पाठिंबा असलेल्या ग्रामविकास पॅनलचा विजय
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं गाव असलेल्या राळेगणसिद्धिमध्ये अण्णा हजारेंचा पाठिंबा असलेल्या ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे. राळेगणसिद्धिमधील 9 पैकी 5 जागांवर ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे.
अहमदनगर Gram Panchayat Election Result 2021
अहमदनगर : राळेगणसिद्धी ग्रामपंचायत निवडणुकीत अण्णा हजारे यांच्या विचाराच्या राळेगण सिद्धी ग्रामविकास पॅनलकडे नऊ पैकी पाच जागा, जयसिंग मापारी, मंगल पठारे, मंगल मापारी, लाभेष औटी, सुनीता गजरे यांचा विजय, तर दोन जागा बिनविरोध
Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 | कणकवली तालुक्यात शिवसेनेचं वर्चस्व दिसून आलं
भाजप नेते नारायण राणे यांचं प्रभाव क्षेत्र असलेल्या कणकवली तालुक्यात तीनही ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. परंतु, याठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व दिसून आलं. कणकवलीत दोन ठिकाणी शिवसेना, तर एका ठिकाणी भाजप विजयी झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 Updates
चंद्रकांत पाटलांचं मूळ गाव खानापूरमध्ये शिवसेनेची बाजी, खानापूरमध्ये प्रकाश आबिटकर यांच्या गटाला 6 जागी यश
Nashik Gram Panchayat Election Result 2021 :दिंडोरी - पालखेडमध्ये शिवसेनेला धक्का
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पालखेडमध्ये शिवसेनेला धक्का, 15 वर्षांनंतर सत्तांतर, भाजप प्रणित पॅनलचे सर्व 13 उमेदवार विजयी
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 3 पॅनल, कोणालाही बहुमत नाही, 9 पैकी राष्ट्रवादीचा 4, शिवसेनेचा 3 आणि काँग्रेसचा 2 जागांवर विजय
सर्वच 7 जागा शिवसेनेकडे तर कढरे ग्रामपंचायतीत शिवसेना पुरस्कृत पॅनलला पाच जागा तर भाजपला अवघ्या दोन जागा, प्रभाग क्रमांक एकमध्ये काकाविरोधात पुतण्या या रंगतदार लढाईत काका अंकुश पाटील विजयी, पुतण्या नागेश पाटील पराभूत
Pune Gram Panchayat Election Result : पुण्यातील श्नीरामनगर ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या हाती
पुणे जिल्ह्यातील श्नीरामनगर ग्रामपंचायतीमधे महाविकास आघाडी पॅनल विजयी, 9 उमेदवारांपैकी 7 बिनविरोध तर 2 लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी
Maharashtra Gram Panchayat Election Result : सातारा - पाटणमधील 18 ग्रामपंचायतींचे निकाल हाती
सातारा : पाटण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींचे निकाल हाती,
आमदार शंभूराजे देसाई यांचे वर्चस्व, शिवसेनेचा 13 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पाच ग्रामपंचायतींमध्ये विजय. मूळगाव, वाडी कोथावडे, कोकस्थळे, धावडे, गोकुळ, पेठ शिवापूर, त्रिपुरी, चोपडी, शिंदेवाडी, सोनवडे, उंबरळी, काहिर, चोपदारवाडी या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ढोंगळेवाडी, कारोळी, तांबकडे, नॅचल, कामरगाव या पाच ग्रामपंचायतींवर विजय मिळवण्यात यश आलं आहे
Aurangabad Gram Panchayat Election Result :कन्नडमध्ये भाजपची सरशी
औरंगाबाद : कन्नडमध्ये शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलच्या पराभव, भाजपच्या नितीन पाटील यांच्या पॅनलचा 15 पैकी 8 जागांवर विजय, तर शिवसेनेला केवळ 4 जागा
Gram Panchayat Election Result :राज्यातील पहिला निकाल जाहीर, कोल्हापुरातील गणेशवाडी ग्रामपंचायत भाजपने जिंकली
ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर, कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा विजय
कराडमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात
साताऱ्यातील कराडमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात, थोड्याच वेळात पहिले कल हाती येणार
सोलापूर जिल्हात एकूण 587 ग्रामपंचायतींमधील 4943 उमेदवारांचे भवितव्य ठरणार
सोलापूर जिल्हात एकूण 657 ग्रामपंचायती असून 67 बिनविरोध झाल्या आहेत. 4 ग्रामपंचायत उमेदवारांनी अर्ज न भरल्याने त्या रद्द झाल्या आहेत. एकूण 587 ग्रामपंचायतींमधील 4943 जागांसाठी 10 लाख 47 हजार 341 मतदारांनी मतदान केलं आहे. आज या 4943 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
नाशिकमध्येही विजयी उमेदवारांना निवडणूक मिरवणुका न काढण्याच्या सूचना
ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवारांना मिरवणूक काढता येणार नाही. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची सूचना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय, लॉकडाऊन संदर्भातील अधिसूचना अद्यापही जारी न झाल्यामुळे मिरवणूक काढणे अभिप्रेत नाही, त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना
पुण्यात मिरवणुका काढण्यास, गुलाल उधळण्यास मनाई
पुण्यात जमावबंदी लागू, विजयी मिरवणूक काढण्यास, फटाके फोडण्यास, गुलाल उधळण्यास परवानगी नाही, ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Gram Panchayat Election Result :औरंगाबादमधल्या पाटोदा, पाचोड आणि पिशोर ग्रामपंचायतीकडे सगळ्यांच्या नजरा
औरंगाबाद जिल्ह्यातील 617 ग्रामपंचायतींची निवडणूक होती. यातील 35 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत. 15 जानेवारीला 589 ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं. ग्रामपंचायतीच्या रिंगणात असलेल्या 11 हजार 499 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे.
आदर्श गाव असलेल्या पाटोदामध्ये पंचवीस वर्ष सत्तेत असलेले सरपंच भास्कर पेरे यांनी ग्रामपंचायत निवडणूकीतून माघार घेतली आहे. 11 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आठ सदस्य बिनविरोध निवडून आले आहे. तर तीन जागांसाठी निवडणूक होते, यात भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे उभ्या आहेत. मंत्री संदीपान भुमरे यांच्या गावात पाचोडमध्येही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये रंगत आहे. त्यांच्या मामाच्या मुलाने त्यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये तीन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर कन्नड तालुक्यातील पिशोर ग्रामपंचायतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या गावात पॅनल उभे आहेत. हर्षवर्धन यांचा मुलगा आदित्य जाधवने यावेळी पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार केला. वडील जेलमध्ये असताना मुलाने आणि आईने ग्रामपंचायतीची धुरा सांभाळली. पिशोर ग्रामपंचायत इथे 17 जागेसाठी निवडणूक होती. त्यात 5 जणांनी आपले स्वतंत्र पॅनल उभे केले होते.
अकोल्यातील कुटासा गावात आमदार अमोल मिटकरी यांचं पॅनल जिंकणार?
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचं कुटासा हे गाव आहे. आमदार मिटकरी यांनी गावात स्वतःचं पॅनल उभं केलं आहे. तर इतर तीन पॅनलही रिंगणात आहेत. यात काँग्रेसचा देशमुख गट आणि भाजपच्या विजयसिंह सोळंके यांची गावात युती आहे. तर वंचित आणि युवक काँग्रेसच्या कपिल ढोके गट आणि शिवसेनेच्या संतोष जगताप यांच्या पॅनल रिंगणात आहे. आमदार मिटकरी या निवडणुकीत गावातच तळ ठोकून होते. मिटकरींनी सर्व 13 जागांवर उमेदवार उभे केले होते. या ग्रामपंचायतीची मतमोजणी अकोट येथे होणारेय.
रत्नागिरीतील लोवले ग्रामपंचायतीत शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष, उपतालुकाप्रमुखाचं उदय सामंतांना आव्हान
रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील लोवले या ठिकाणी उपतालुकाप्रमखाने थेट राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना आव्हान देत शिवसेनेचं वेगळं पॅनल उभं केलं आहे. परिणामी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. तर 20 वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली नावडी ग्रामपंचायत शिवसेनेने मागील निवडणुकीत आपल्या ताब्यात घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीने या ठिकाणी पुन्हा आपली ताकद लावली आहे. या ठिकाणी आमदार शेखर निकम आणि मंत्री उदय सामंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण, हा गाव अर्धा सामंत तर अर्धा निकम यांच्या मतदारसंघात मोडतो. राजापूर आणि लांजा तालुक्यामध्ये नेमकी कोणाला पसंती मिळते हे पाहावं लागेल. कारण इथे प्रत्येक जण स्वतंत्र लढला आहे. हे शिवसेनाचा बालेकिल्ले आहेत.
राळेगणसिद्धी गावात बिनविरोध निवडणुकीच्या घोषणेनंतरही मतदान, गावकऱ्यांचा कौल कोणाला?
अहमदनगर मधील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावात होत असलेली ग्रामपंचायत निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. करण या गावात बिनविरोध निवडणुकीची घोषणा होऊनही निवडणूक लढवण्यात आली होती. राळेगणसिद्धीमध्ये आचारसंहिता भंग देखील झाली होती. मतदारांना साड्यांचं वाटप करून प्रलोभनं दाखवण्यात आली होती. त्यामुळे राळगेणसिद्धी मधील वातावरण ढवळून निघालं होतं. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Gram Panchayat Election Result : बुलढाण्यातील 489 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी
बुलढाणा : जिल्ह्यात मतमोजणीच्या 189 फेर्या पार पडणार आहेत. जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील 489 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं असून आज सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण 156 टेबलावरून मतमोजणीच्या एकूण 189 फेऱ्या होतील. मतमोजणी 777 कर्मचारी करणार असून मतमोजणीसाठी इतर 449 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परभणीतील 498 ग्राम पंचायतींचा निकाल, 8717 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला
परभणी जिल्ह्यातील एकुण 566 ग्रामपंचायतीसाठी यंदा निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे. ज्यातील 68 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 498 ग्रामपंचायतीसाठी विक्रमी 83 टक्के मतदान झाले आहे. आज प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. जिल्हाभरातील तब्बल 8717 गावपुढाऱ्यांच्या भवितव्याचा निकाल आज लागणार आहे. जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असलेली ग्रामपंचायत : जिल्ह्याचे आणि जिंतुर-सेलु विधानसभेचे लक्ष लागलेली एकच ग्रामपंचायत आहे, ती म्हणजे बोरी. बोरीमध्ये विद्यमान भाजप आमदार मेघना बोर्डीकर विरुद्ध राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. झरी ही ग्राम पंचायत मोठी आहे मात्र इथे मोठ्या नेत्यांची नाही गावातीलच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. जांब ग्रामपंचायत ही दिग्गज नेत्यांची ग्रामपंचायत इथे शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत होत आहे. ज्यात शिवसेनेकडून आमदार डॉ राहुल पाटील तर काँग्रेसकडून माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार मीरा ताई रेंगे यांचा प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
संगमनेर तालुक्यात कोणाचं वर्चस्व? काँग्रेस विरुद्ध भाजप थेट सामना
संगमनेर तालुक्यातील 90 ग्रामपंचायत पैकी 14 ग्रामपंचायत निवडणूक निकालांकडे अवघ्या जिल्ह्यातील नागरिकांच लक्ष लागलं असून या 14 ठिकाणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात विरुध्द भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटात सरळ लढत होत आहे. त्यामुळे वर्चस्व कोण राखणार हे पाहणं महत्वाच आहे.
अकलूज ग्रामपंचायतीसाठी मोहिते विरुद्ध मोहिते निकालाकडे राज्याचे लक्ष
मोहिते विरुद्ध मोहिते हा दुसऱ्या पिढीतील संघर्ष अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा समोर आल्यानंतर आज होणाऱ्या मतमोजणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विरुद्ध माजी मंत्री कै प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष आता पुढची पिढी धैर्यशील मोहिते विरुद्ध डॉ धवलसिंह मोहिते यांच्यात सुरु आहे. अकलूज ग्रामपंचायतीमध्ये 17 जागा असून एक जागा विरोधी धवलसिंह मोहिते पाटील यांनी आधीच जिंकल्याने आता 16 जागांसाठी विजयसिंह मोहिते पाटील विकास पॅनलचे 16, प्रतापसिंह मोहिते पाटील विकास पॅनलचे 16 आणि 15 अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. दोन्ही मोहिते घरातील संघर्षामुळे अकलूज ग्रामस्थांनी केलेले 58 टक्के मतदान तणाव दाखवतो. अकलूजकर कोणत्या मोहितेने साथ देणार हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार असले तरी भाजपवासी झालेले मोहिते यांच्या गटावर डॉ धवल मात करणारे का याकडे बारामतीकरांचेही बारीक लक्ष आहे.
परभणीतील बोरी ग्रामपंचायतीकडे सर्वांचं लक्ष, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
परभणी : जिल्ह्यातील एकूण 566 ग्राम पंचायतींसाठी यंदा निवडणूक प्रक्रिया पार पडतेय ज्यातील 68 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्यानं उर्वरित 498 ग्रामपंचायतींसाठी विक्रमी 83% मतदान झालेलं आहे. आता थोड्याच वेळात प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. जिल्हाभरातील तब्बल 8717 गावपुढाऱ्यांच्या भवितव्याचा निकाल आज लागणार आहे. जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असलेली ग्रामपंचायत म्हणजे, बोरी ग्रामपंचायत. संपूर्ण जिल्ह्याचे आणि जिंतुर-सेलू विधानसभेचे लक्ष या ग्रामपंचायतीकडे लागलेलं आहे. बोरीमध्ये विद्यमान भाजप आमदार मेघना बोर्डीकर विरुद्ध राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
Gram Panchayat Election Result : कोल्हापुरात चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ यांच्या गावात कोणाचा विजय?
कोल्हापूर जिल्ह्यात 433 पैकी 47 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर 386 ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदान झालं. या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात भाजपसोबत दोन्ही काँग्रेस गेले आहेत. त्यामुळे तिथल्या निकालावर लक्ष असेल. शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर याचं पॅनल विरोधात आहे. तर हसन मुश्रीफ यांचं मतदान असलेल्या लिंगनूर दुमाला याठिकाणी काय निकाल लागतो हे पाहावं लागेल. काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांच्या सडोली खालसा याठिकाणी देखील निवडणूक झालीय तिथल्या निकालावर लक्ष असेल. याशिवाय सतेज पाटील आणि महाडिक या दोन्ही गटात मुडशिंगी गाव विभागलं आहे. या गावातील निकाल देखील महत्त्वाचा असणार आहे.
पुण्यातील उरळी कांचन, शिक्रापूर, कोरेगाव-भीमा, तळेगाव ढमढेरे, वडगाव देसाई आणि हिंजवडी ग्रामपंचायतींमध्ये चुरस
पुणे जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी होत आहे. जिल्ह्यातील 95 ग्रामपंचायतींमधील सदस्य बिनविरोध निवडले आले आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्या तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. पुणे जिल्ह्यातील औद्योगिक टप्प्यातील म्हणजे मोठ्या एमआयडीसी असलेल्या उरळी कांचन, शिक्रापूर, कोरेगाव भीमा, तळेगाव ढमढेरे, वडगाव देसाई ही आमदार अशोक पवारांच्या गावातील आणि आयटी हब असलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतींमध्ये मोठी चुरस आहे. हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी होईल
वाशिम जिल्ह्यातील 3192 उमेदवारांचा फैसला आज
वाशिम जिल्ह्यात 163 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 11 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात 152 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रकिया पार पडली असून आ निकाल हाती येणार आहेत बिनविरोध झालेल्या 11 ग्रामपंचायतींसह इतर 41 ग्रामपंचायतीमधील एकूण 252 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरीत 152 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाल्या. जिल्ह्यातील 486 प्रभागातील 1233 जागांसाठी 539 मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीत नशिब आजामावत असलेल्या 3192 उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा फैसला आज होईल. या ग्रामपंचायत निवडणुकीवर सर्व राजकीय पक्षाने दावे केले असले तरी मात्र गाव गाड्याची निवडणूक ही स्थानिक मुद्दे आणि गटातटाची असल्याने कोणत्याच पक्षा जातीने लक्ष घातलेलं नाही. मात्र प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक महत्वाची असल्याने त्यांचं अस्तित्व सिद्ध करणारी असते. सर्व आमदार, खासदारांनी तसं दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे.
मात्र मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या बारीक लक्ष असल्याचं चित्र आहे वाशिम जिल्ह्यातील कामारगाव, अनसिंग, शिरपूर जैन, शेलुबाजार या ग्रामपंचायत श्रीमंत असल्याने इथल्या निवडणूक महत्त्वाच्या असणार आहेत.
पार्श्वभूमी
Gram Panchayat Election Result : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाची आता लाखो उमेदवारांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. या निवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले. मतमोजणीला साधारण 10 वाजेपासून सुरुवात होईल. सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी स्तरावरुन काही मनाई आदेश आणि महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या मतमोजणीसाठी तालुक्याच्या ठिकाणी प्रशासन सज्ज झालं आहे.
राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील 162 ग्रामपंचायतींसाठी 20 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. विविध कारणांमुळे 15 तारखेला प्रत्यक्षात 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात 22 जानेवारी 2021 रोजी; तर अन्य सर्व जिल्ह्यांत 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होईल.
मतमोजणीच्या ठिकाणी या गोष्टींना मनाई
मतमोजणीच्या संपूर्ण परिसरात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वगळता इतर कोणत्याही व्यक्तींना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोबत तंबाखूजन्य पदार्थ, आगपेटी, लायटर, ज्वालाग्राही पदार्थ अथवा कोणतेही घातक पदार्थ किंवा वस्तू मतमोजणीच्या ठिकाणी घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात निवडणूक संबंधित अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे दोन अधिकृत प्रतिनिधी आणि पासधारक व्यक्ती यांच्या शिवाय कोणालाही प्रवेश करण्यास परवानगी नसणार आहे.
Maharashtra Gram Panchayat Elections 2021 LIVE Updates: ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा!
15 तारखेला मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी एकूण 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननी आणि माघारीनंतर 2 लाख 41 हजार 598 उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी 26 हजार 718 उमेदवार बिनिविरोध विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंतिमत: 2 लाख 14 हजार 880 उमेदवार आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले.
Gram Panchayat Election : ग्रामपंचायतींसाठी उत्साहात मतदान, आता लक्ष सोमवारच्या निकालाकडे
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. एकूण- 12,711.
ग्रामपंयात निवडणूक एक दृष्टिक्षेप
• निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
• प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
• एकूण प्रभाग- 46,921
• एकूण जागा- 1,25,709
• प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
• अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
• वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
• मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
• बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
• अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -