Gram Panchayat Election Results 2022 : राज्यातील 7135 ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर झाले. यात कोकण विभागात भाजपने बाजी मारली आहे. कोकण विभागात 210 ग्रामपंचायतीमध्ये भाजपने सत्ता मिळवली आहे. तर  तर शिंदे गटाला 150 एवढ्या जागा मिळाल्या आहेत. ठाकरे गटाने 168 एवढ्या जगांवर विजय मिळवला आहे. परंतु, ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर लढल्या जात नाहीत तर त्या स्थानिक पातळीवर लढल्या जातात.  
 
सिंधुदुर्ग


भाजप : 182
उद्धव ठाकरे गट : 73
शिंदे गट : 24
ग्रामविकास पॅनल : 39
राष्ट्रवादी : 01
अपक्ष : 02


देवगड तालुक्यातील विजयदुर्ग ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडणूक झालेली नाही. 


रत्नागिरी 
रत्नागिरी जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात ठाकरे गटाने बाजी मारली आहे. ठाकरे गटाला सर्वाधिक जास्त म्हणजे 101 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे.  


ठाकरे गट -101
शिंदे गट - 45
इतर - 47
भाजप - 17
राष्ट्रवादी - 8
काँग्रेस - 3


एका जागेवर अर्ज नाही.


रायगड जिल्ह्यात शिंदे गटाची सरशी


रायगड जिल्ह्यात शिंदे गटाची सरशी झाली आहे. राडगडमध्ये 240 पैकी 79 जागांवर शिंदे गटाचा विजय झालाय.  महाविकास आघाडी 39, ठाकरे गट 23, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 30 जागांवर विजय झालाय.  तर महाड येथील 32 पैकी 21 ग्रामपंचयतींवर शिंदे गटाचा विजय झालाय. माणगाव तालुक्यात महाविकास आघाडीचा 10 जागांवर विजय झालाय. 
 
शिवसेना भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाच्या उमेदवारांकडून लक्ष लागून राहिले होते. यामध्ये, रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात पणाला लागली होती. रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींपैकी 49 ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या होत्या. तर, यामध्ये महाड तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींचा समावेश असल्याने सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आज झालेल्या मतमोजणीनंतर शिंदे गटाने 79 ग्रामपंचायतींवर विजय मिळविला असून महाविकास आघाडीने 39 जागांवर विजय मिळविला आहे. 
 
पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचा डंका


पालघर जिल्ह्यातील 63 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल हाती आले असून यात बहुजन विकास आघाडीने वर्चस्व राखले आहे. पालघरमध्ये भाजप 11 ,  राष्ट्रवादी 4 , बहुजन विकास आघाडी 13 ,  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 7 ,  बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट ) 2 ,  मनसे 3 , अपक्ष 22  तर श्रमजीवी संघटनेला एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश आल आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत सर्वाधिक जागा आहेत राजकीय पक्षांना दूर ठेवलेल्या अपक्षांना मिळाल्या असून बहुजन विकास आघाडीला सर्वाधिक 13 तर भाजपला 11 जागांवर यश मिळाल आहे. जिल्ह्यात मनसेनेही चांगली मुसंडी मारली असून जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या सातपाटी ग्रामपंचायतीवर विजय मिळवत मनसेने प्रस्थापितांना मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाला आहे या निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.


महत्वाच्या बातम्या


Gram Panchayat Election Results 2022 : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा झेंडा; ठाण्यात कमळ सुसाट