उस्मानाबाद : आगामी निवडणूक आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती करण्याचे सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. भरतीच्या नियोजित कार्यक्रमाची माहिती शिक्षण आयुक्तांनी संबंधित जिल्ह्यांमधील शिक्षणाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिली आहे. एकूण 18 जागांसाठी ही शिक्षक भरती होणार आहे.
भरतीचा ठरला नियोजित कार्यक्रम
18 हजार जागांसाठी भरती
- 21 जानेवारी : पवित्र पोर्टलवरील अर्ज दुरुस्ती
- 30 जानेवारी : पवित्र पोर्टल अपलोड करणे
- 3 फेब्रुवारी : भरतीची जाहीरात प्रसिद्ध करणे
अडचणी काय आहेत?
- राज्यातील 36 टक्के शाळांनी खासकरुन जिल्हा परिषद शाळांनी बिंदुनामावली अपडेट केले नाही.
- मंजूर प्रवर्ग आणि नियुक्ती प्रवर्ग वेगळा असल्याचे समोर आल्याने शिक्षक भरतीबाबत चिंता.
- केंद्राने आर्थिक निकषांनुसार सवर्णांना 10 टक्के आरक्षण जाहीर केले, परंतु त्याबाबत शिक्षण विभागाला लेखी पत्र मिळाले नाही. त्यामुळे शिक्षक भरतीत हे आरक्षण लागू होईल का, याबाबत शिक्षण विभाग संभ्रमात आहे
- आंतरजिल्हा बदलीचा तिसरा टप्पाही पार पडणार असल्याने नियोजित वेळापत्रकानुसार पार पडाताना दमछाक.
येत्या 5 मार्चपर्यंत राज्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल आणि त्यापुढेही टप्प्याटप्प्यानं भरती होत राहिल असं आश्वासन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी काही दिवसांपूर्वी एबीपी माझाशी बोलताना दिलं होतं.