कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी रास्त आहे. हा प्रश्न ज्वलंत आहे, मात्र हे सरकार आरक्षण देण्यात प्रामाणिक नाही. त्यामुळे आश्वासन पूर्ण करता न आल्याने सरकारने जनतेची माफी मागावी आणि हात मोकळे करावे, असा टोला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी भर पावसात ठिय्या मांडला. मराठा आरक्षणाला पाठिंबा देत त्यांनी कोल्हापुरातील दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिया मांडला.
एका खाजगी कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आले असता पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. नोकर भरती, मराठा आरक्षण, सांगली महापालिका निवडणूक आणि अनेक मुद्द्यांवर त्यांनी उत्तरं दिली.
“सांगलीतील पराभव मान्य”
सांगली महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचा झालेला पराभव मान्य आहे. पैशाच्या जोरावर काँग्रेसचे कार्यकर्ते उचलायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच ही कार्यपद्धती फार काळ टिकत नसल्याचंही ते म्हणाले.
जानेवारी - फेब्रुवारी 2019 ला लोकसभा निवडणुका होण्याचे संकेत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले असून जीएसटी नोटाबंदी हे सर्व फसलं आहे, असं ते म्हणाले. जर पुन्हा ही जोडगोळी निवडून आली तर पुन्हा निवडणुका होणार नाहीत, त्यामुळे सर्व विरोधक एकत्र आले असल्याचं त्यांनी सांगितलं.
आरक्षणासाठी सरकार प्रामाणिक नाही : पृथ्वीराज चव्हाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Aug 2018 03:30 PM (IST)
आश्वासन पूर्ण करता न आल्याने सरकारने जनतेची माफी मागावी आणि हात मोकळे करावे, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -