मुंबई : नोटाबंदीमुळे आता सरकारी कर्मचारी चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनाला जाणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी रोकड पगार देण्याची मागणी केली आहे.
दोन महिन्याचा पगार रोकड द्यावा, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सरकारकडे केली आहे. याबाबत संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे.
हिवाळी अधिवेशन येत्या 5 डिसेंबरपासून सुरु होत आहे. यापूर्वी बँक खात्यात पगार जमा व्हायचा. मात्र आता बँकांमध्ये पैसे काढणे कठीण झाल्याने रोकड पगार देण्याची मागणी करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनात पैशांची चणचण टाळण्यासाठी कर्मचारी संघटना रोकड पगारासाठी आग्रही आहे.