शिर्डी : नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक धार्मिक स्थळांमध्ये जुन्या नोटांचा पाऊस पडला. शिर्डीतील साईबाबांच्या चरणी कोट्यवधींचं दान अर्पण झालं आहे, मात्र यामध्ये दोन हजारच्या नवीन नोटांचाही समावेश आहे.


गेल्या सहा दिवसात साईबाबांच्या दानपेटीत दोन कोटी 32 लाखांचं दान जमा झालं आहे. या दानामध्ये जुन्या एक हजार आणि पाचशेच्या नोटांसोबतच नव्या चलनाचाही समावेश आहे.

जुन्या पाचशेच्या 9 हजार 218 तर एक हजारच्या 3 हजार 250 नोटा दानपेटीत जमा झाल्या आहेत. दोन हजाराच्या 999 तर पाचशेच्या 51 नव्या नोटा दानपेटीत आहेत.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे नोटाबंदीनंतर हजार रुपयांच्या नोटांच्या संख्येत 30 टक्के तर पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये तब्बत 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आतापर्यंत दानपेटीत सुट्टी नाणी, 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा वाहण्याचं प्रमाण अधिक होतं. मात्र जुन्या नोटा खपवण्यासाठी अनेकांनी हा पर्याय अवलंबला असावा.

संबंधित बातम्या :


पंढरपुरात विठ्ठल चरणी जुन्या हजार-पाचशेच्या नोटांचा पाऊस


दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या दानपेट्या उघडल्या