कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.


महाराष्ट्र सोडून न जाणे, पासपोर्ट कोर्टाच्या ताब्यात देणं अशा विविध अटी समीर गायकवाडवर घालण्यात आल्या आहेत. जिल्हा सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांनी, 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.

समीरचे वकील समीर पटवर्धन आणि वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानण्यात आला. 

दरम्यान सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देणार असल्याची माहिती, पानसरेंची सून मेधा पानसरे यांनी दिली.

समीर गायकवाडवरील अटी

  •  महाराष्ट्र सोडायचा नाही

  • पासपोर्ट कोर्टाच्या ताब्यात देणं

  • कोल्हापूर जिल्हा बंदी

  • दर रविवारी तपास यंत्रणेकडे (SIT) 11 ते 2 हजेरी लावणे

  • जिथं राहणार आहे त्याचा पत्ता कोर्टाला सादर करणे

  • साक्षीदाराला न धमकवणे


 कोण आहे समीर गायकवाड?


समीर गायकवाडचे फोन कॉल्स तपासूनच त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. ज्या दिवशी पानसरेंवर हल्ला झाला, त्या दिवशीचे फोन कॉल्स तपासण्यात आले. याशिवाय समीरचे सुमारे 2 कोटी फोन कॉल्स तपासूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

कोण आहे समीर गायकवाड?

  • समीर गायकवाड सांगलीच्या 100 फुटी रोड परिसरात राहतो

  • 1998 पासून सनातनचा कार्यकर्ता

  • पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून सांगलीतून जेरबंद


पानसरे दाम्पत्यावर हल्ला

16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉ. पानसरे दाम्पत्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी ते राहत असलेल्या सागरमळा परिसरात दोन बंदुकीतून प्राणघातक हल्ला केला होता.  या हल्ल्यात गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा जखमी झाल्या होत्या. मात्र कॉ. पानसरे गंभीर जखमी होते.

त्यांच्यावर कोल्हापुरातच उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी कॉ. पानसरेंना मुंबईला आणण्यात आलं होतं. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना शुक्रवारी 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. तब्बल पाच दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही.

कोण होते कॉम्रेड गोविंद पानसरे?

– कॉम्रेड गोविंद पानसरे हे डाव्या चळवळीतलं मोठं नाव

– श्रीरामपूरच्या कोल्हार गावात जन्म

– कोल्हारमध्येच सातवीपर्यंतचं शिक्षण

– विवेकवाद, बुद्धीप्रामाण्य आणि पुरोगामी विचारवंत

– शालेय जीवनात राष्ट्रीय सेवा दलाकडे पानसरेंचा कल

– कम्युनिस्ट पक्ष संघटना, मार्क्सवादी विचारांवर भर

– कामगार संघटना, जनसंघटना उभी करत पक्ष वाढीचं काम

– कोल्हापूर आणि परिसरात १० ते १५ कामगार संघटना

– कोल्हापुरातील गुंडगिरीविरोधात कॉ. पानसरेंचा मोर्चा

– अभ्यासू वक्ता, लेखक, प्रबोधक आणि आंदोलक अशा विविध भूमिका

– 21 पुस्तकांच्या माध्यमातून कॉम्रेड कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले.

संबंधित बातम्या

कॉ. पानसरेंच्या हत्येमागे चौघेजण, पोलिसांचा आरोपपत्रात दावा

पानसरे हत्या: समीर गायकवाड सनातनचा कार्यकर्ता, आख्खं कुटुंब सनातनशी संबंधित ! 

कॉ. पानसरे यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या!

भेकडांनो, हे घ्या उत्तर, पानसरेंच्या ‘शिवाजी कोण होता?’च्या विक्रीत वाढ

पानसरे, दाभोलकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, लाईक-कॉमेंट करणाऱ्यांवरही गुन्हे 

कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकरांच्या हत्येबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर 

लढवय्या कॉम्रेडला अखेरचा लाल सलाम, गोविंद पानसरे अनंतात विलीन 

पानसरेंच्या मारेकऱ्यांना दिसताक्षणीच गोळ्या घाला, डॅशिंग उदयनराजेंचं बेधडक मत

कॉम्रेड पानसरेंचा शोकप्रस्ताव मांडण्यास सरकारचा नकार