अहमदनगरमध्ये एक कोटींचा गांजा जप्त
एबीपी माझा वेब टीम | 17 Jun 2017 10:20 AM (IST)
अहमदनगर : पोलिसांनी अहमदनगरमध्ये एक कोटींचा गांजा पकडला आहे. अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर पेट्रोलिंग करताना अहमदनगर पोलिसांनी ही कारवाई केली. औरंगाबादकडून नगरच्या दिशेने ईनोव्हो आणि बोलेरो कार भरदाव वेगाने येत होती. त्यावेळी पोलीसांनी त्यांना थांबवण्याचा ईशारा केला. मात्र दोन्ही गाड्या न थांबताच शहरात आल्या. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करुन गाड्यांची तपासणी केली. यावेळी ईनोव्हो गाडीत एक पुरुष एक महिला बोलेरो तर दोन पुरुष एक महिला गांजासह आढळले. गाडीत एक कोटींपेक्षा जास्त किंमतीचा गांजा आढळला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी गांजा ताब्यात घेतला आहे. दरम्यान गांजा तस्करीचं एकादं रॅकेट तर कार्यरत नाही ना, याचा शोध घेण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.