मुंबई : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी उद्या मंत्रालयात महत्वाच्या बैठकीच आयोजन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - पाणलोट विकास घटक 2.0 योजने अंतर्गत पाणलोट यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. या यात्रे संदर्भात मंत्री संजय राठोड यांनी मंत्रालयात उद्या महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकिला 'दुष्काळ मुक्त महाराष्ट्र' करण्यासाठी त्याबरोबर पाण्याचे स्त्रोत वाढवण्यासाठी कार्यरत असलेल्या 100 हून अधिक NGO ना निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये प्रतिष्ठीत नाम फाऊडेंशन, पाणी फाऊंडेशन सारख्या नामंकित संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकिला आदर्श गावचे हिवरे बाजारचे कार्यकरी अध्यक्ष पोपटराव पवार मार्गदर्शन करणार आहेत.
पाण्याचे स्त्रोत वाढवण्यासाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रण
मिळालेल्या माहितीनुसास मंत्रालयाच्या 7 व्या मजल्यावर उद्या दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जलसंचिनाच्या संदर्भात महत्वाची बैठक बोलावली आहे. पाण्याचे स्त्रोत वाढवण्यासाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना देखील उद्या बोलवण्यात आलं आहे. या सर्वांना पोपटरा पवार मार्गदर्शन करणार आहेत.
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नदी जोड प्रकल्पावर भर
पुढच्या काळात नदीजोड चार नदीजोड प्रकल्पावार माझा भर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली होती. मी आता चार प्रकल्पांना मान्यता दिली आहे. हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करु शकतात असे फडणवीस म्हणाले होते. तसेच ग्रीन एनर्जीवर देखील माझा भर राहणार आहे. 2030 मध्ये 52 टक्के वीज ग्रीन एनर्जी असेल असंही फडणवीस म्हणाले. याचा शेती उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. यामुळं रोजगाराची निर्मिती होईल, अर्थव्यवस्थेला विशेष चालना मिळेल असेल असे फडणवीस म्हणाले. येणाऱ्या काळात अनेक गोष्टी करायच्या आहेत. सगळ्या योजना चालवायच्या आहेत असे त्यांनी सांगितले होते.
राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई
धुळे, नंदुरबार, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, सोलापूर , माण, खटाव, धाराशिव, लातूर, पश्चिम विदर्भ आदी भागांना दीर्घकाळापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुरेशा सिंचनाअभावी स्थलांतर आणि शेतकरी आत्महत्या या भागात अनेकदा दिसून येतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि जीवनमान सुधारण्यासाठी या दुष्काळी भागात पुरेसे सिंचन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या: