मुंबईः आशिष शेलारांच्या सर्वेश्वर लॉजिस्टीक्स या कंपनीकडे कुठलंही बिझनेस मॉड्युल नसताना 18.5 कोटी मिळवले आहेत, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. सर्वेश लॉजिस्टीक्स या कंपनीवर आशिष शेलार संचालक असल्याचा दावाही आम आदमी पक्षानं केला आहे.


 

 

प्रिती शर्मा मेनन यांनी यासंदर्भात मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि आरोप केले. यासंदर्भात आम आदमी पक्षाने एसीबी, ईडी, निडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार देखील केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

 

 

एकीकडे दोन्ही सभागृहात भाजपाच्या भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी करा अशी मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे 'आप'ने  भाजपाच्या मुंबई अध्यक्षांवरच गंभीर आरोप केले आहेत.