उस्मानाबाद : हाडापासून भुकटी करणारे सहा कारखाने सील करण्यात आले आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात उस्मानाबादच्या डोंगराळ भागात महसूल आणि पोलीस विभागाची संयुक्त कारवाई केली. उस्मानाबाद तालुक्यातल्या पिपंरीच्या ग्रामस्थांच्या आनेक वर्षांपासूनच्या मागणीनंतर अखेर महसूल खात्याने पाऊल उचललं आहे.


 

या कारवाईवेळी अतिशय भयंकर चित्र समोर आलं आहे. वन विभागाच्या वनाशेजारी तात्पुरत्या स्वरूपात मंजूरी मिळालेल्या दोन कारखान्यांऐवजी प्रत्यक्षात सहा कारखाने असल्याचं उघड झालं.

 

या कारखान्याचे मालकही मुंबई आणि हैराबादचे रहिवाशी असल्याचं उघड झालं आहे. रोज 20 टन माल एका-एका कारखान्यातून मुंबईला पाठवला जात होता. अतिशय दुर्गर्धींमुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी 10 वर्षे लढा दिल्यावर आजची ही कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी एकाच कारखान्याचे मालक उपस्थित होते. बाकीचे मालक आणि परप्रांतीय कामगार पळून गेले. त्या मालकांमी मात्र ग्रामस्थांचे सर्व आरोप फेटाळले असले, तरी हाडांच्या भुकटीपासून काय बनत होते ते माहित नसल्याचं मान्य केलं आहे.