मुंबईः नशाबंदी कायद्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. व्यसनाधितेमुळेच राज्यात गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळेच कोपर्डीसारख्या घटना घडत आहेत, असं अण्णांनी सांगितलं.


 

 

व्यसनाधिनता रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामसंरक्षण दल स्थापण्याची गरज अण्णांनी व्यक्त केली आहे. हे ग्रामसंरक्षण दल स्थापण्यासंदर्भात विधिमंडळात कायदा आणण्याची मागणीही अण्णांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

 

 

पोलिसांना अवैध दारुचा पुरवठा रोखण्यात अपयश येत असल्यानं लोकांना अधिकार देण्याची गरज अण्णांनी व्यक्त केली आहे. दारुबंदी करुनही दारुबंद रोखण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत, त्यामुळे दारुबंदी रोखण्यासाठी लोकांनाच अधिकार द्यावेत, अशी मागणी अण्णांनी केली.