मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी बहुजन समाजासाठी केलेलं काम कुणी झाकू शकत नाही असं कौतुक भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी केले आहे. पडळकर यांनी ट्विट करून धनगर बांधवांसाठी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली आहे.
‘जे जे आदिवासींना ते ते धनगर समाजाला’या धोरणांतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी लागू केलेल्या 22 योजना प्रस्थापितांनी बंद केल्या होत्या. त्या आता परत लागू करण्याचे फडणवीस यांनी आदेश दिले आहेत. तुम्ही बहुजन समाजासाठी केलेलं काम कुणी झाकू शकत नाही.जय मल्हार, असं ट्विट पडळकर यांनी केलं आहे.
गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. परंतु, भाजप सरकारच्या काळात जे जे आदिवासींना ते ते धनगर समाजाला मिळेल या धोरणातंर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी 22 योजना लागू केल्या होत्या. तेव्हाचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात त्यासाठी एक हजार कोटींची आर्थिक तरतूदही केली होती. परंतु, त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने या योजना बंद केल्याचा आरोप गोपिचंद पडळकर सतत करत होते.
अडीच वर्षानंतर पुन्हा राज्यात भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे बंद झालेल्या योजना पुन्हा सुरू करण्यात याव्या यासाठी गोपिचंद पडळकर प्रयत्न करत होते. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजना पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे गोपिचंद पडळकर यांनी त्यांचे आभार मानत बंद झालेल्या योजना पुन्हा सुरू केल्याने देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
महत्वाच्या बातम्या