कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 09 May 2018 08:07 AM (IST)
पोलिसांनी राहुल चाबुकस्वार या गुंडाला शहरातून 2 वर्षांसाठी तडीपार केलं आहे. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न करणे, यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
औरंगाबाद : औरंगाबादमधून तडीपार असलेल्या एका गुंडाचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो सध्या व्हायरल होतो आहे. राहुल साहेबराव चाबुकस्वार असं या तडीपार गुंडाचं नाव आहे. औरंगाबाद शहरातील पोलीस ठाण्यात राहुल साहेबराव चाबुकस्वार याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुंडाने स्वत: फेसबुकवर मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. राहुल चाबुकस्वार औरंगाबादमधील हुसेनी कॉलनीचा रहिवाशी आहे. पोलिसांनी राहुल चाबुकस्वार या गुंडाला शहरातून 2 वर्षांसाठी तडीपार केलं आहे. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न करणे, यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. हे सर्व गुन्हे औरंगाबाद शहरातील जवाहारनगर, मुकुंदवाडी आणि एम सिडको पोलीस ठाण्यात दाखल आहेत.