चंद्रपुरात मालगाडीचे 16 डबे घसरले, वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या रद्द
एबीपी माझा वेब टीम | 06 Jan 2017 11:35 AM (IST)
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात विहीरगावजवळ मालगाडीचे 16 डबे घसरले. यामुळे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. रात्री उशिराच्या सुमारास कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे डबे घसरल्यानं दुर्घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या लोहमार्गावर ही दुर्घटना घडली त्या मार्गावरुन जवळपास 60 रेल्वे गाड्या ये-जा करतात. त्यामुळे या सर्व गाड्या चंद्रपूर-बल्लारशा रेल्वे स्थानक टाळून माजरी रेल्वे स्थानकातर्फे वळवण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेमुळे जवळपास 5 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, रेल्वे रुळाला तडे गेल्यानं हा अपघात घडल्याचं प्राथमिक माहिती मिळते आहे.