गोंदिया : शिक्षिका असलेल्या पत्नीची भरवर्गात विद्यार्थ्यांसमोर हत्या करणाऱ्या पतीला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पत्नी सन्मानपूर्वक वागणूक देत नसल्याच्या रागातून हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील इरीटोला गावात राहणाऱ्या दिलीप डोंगरेने आपल्या पत्नीच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसमोरच तिची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली होती. यानंतर घटनास्थळावरुन त्याने पळ काढला होता. या प्रकरणाचा छडा लावत गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आरोपी पतीला दोन दिवसात अटक केली. गोंदिया आमगाव मार्गावरुन जात असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
पत्नी आपल्याला सन्मान देत नव्हती, तसंच पैसेही देत नसे. त्यामुळे रागाच्या भरात शाळेत जाऊन तिला जीवे मारल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे.
काय घडलं होतं?
मयत शिक्षिका प्रतिभा डोंगरे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शाळेत गेल्या होत्या. त्यांच्यापाठोपाठ पती दिलीप डोंगरेही शाळेच्या कार्यालयात आला. त्याने पत्नीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर डोकं आणि मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाला होता.
शाळेत कुऱ्हाडीने वार करुन शिक्षिकेची हत्या करणाऱ्या पतीला दोन दिवसात अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jul 2019 05:02 PM (IST)
पत्नी आपल्याला सन्मान, तसंच पैसे देत नसल्यामुळे रागाच्या भरात शाळेत जाऊन तिची हत्या केल्याची कबुली आरोपी पतीने पोलिसांना दिली आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -