गोंदियामध्ये गोळ्या झाडून प्रेमी युगुलाची शेतात आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2016 12:40 PM (IST)
गोंदिया : गोंदियामध्ये एका प्रेमी युगुलाने गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 वर्षीय काजल मेश्राय आणि 26 वर्षीय आकांत वैद्य यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. काजल मेश्राय आणि आकांत वैद्य गोंदियाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होते. मंगळवार संध्याकाळपासून दोघंही जण बेपत्ता होते. त्यानंतर घिवारी गावातील शेत शिवारात जाऊन त्यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून घेतल्या. बुधवारी हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळावरुन मृतदेहाजवळून पोलिसांनी देशी पिस्तुल आणि सुसाईड नोट जप्त केली आहे. गोंदियातील रावनवाडी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.